Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EFP Rate: ईपीएफ खातेधारकांना Holi पूर्वी मिळणार बक्षीस, Provident Fund वर व्याज वाढण्याची शक्यता?

चालू आर्थिक वर्षात ईपीएफओला त्यांच्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळाला आहे असे मानले जात आहे. २०२४-२५ मध्ये, ईपीएफवर ८.२५ टक्के व्याज मंजूर केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 13, 2025 | 12:10 PM
ईपीएफओचे व्याजदर वाढण्याची शक्यता (फोटो सौजन्य - iStock)

ईपीएफओचे व्याजदर वाढण्याची शक्यता (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

होळीपूर्वी सुमारे ७ कोटी ईपीएफ खातेधारकांना मोठी भेट मिळू शकते अशी शक्यता आता समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षात EPF वर ८.२५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याआधी २०२३-२४ या आर्थिक वर्षातही कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याज देण्यात आले होते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गुंतवणूक वित्त आणि लेखापरीक्षण समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, ज्यामध्ये चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ईपीएफओचे उत्पन्न आणि खर्च विचारात घेतला जाईल. या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज द्यावे हे ठरवले जाईल आणि त्यानंतर कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदरावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर अंतिम झाल्यानंतर, तो मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल.

EPFO चा परतावा 

२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी, ईपीएफ खातेधारकांना ८.२५ टक्के, २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.१० टक्के दराने व्याज मिळाले. चालू आर्थिक वर्षात, ईपीएफओला त्यांच्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळाला आहे असे मानले जाते. त्याच वेळी, भविष्य निर्वाह निधी दाव्याच्या निपटाराबाबत ईपीएफओने इतिहास रचला आहे. 

२०२४-२५ या आर्थिक वर्षात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ५ कोटींहून अधिक दावे निकाली काढले आहेत जे एक विक्रम आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, ईपीएफओने २,०५,९३२.४९ कोटी रुपयांचे ५.०८ कोटी दावे निकाली काढले आहेत, जे २०२३-२४ या आर्थिक वर्षात १,८२,८३८.२८ कोटी रुपयांच्या ४.४५ कोटी दाव्यांपेक्षा खूपच जास्त आहे.

वाढू शकतो PF चा व्याजदर? सरकार देणार का अजून एक मोठं गिफ्ट

७ कोटीपेक्षा अधिक ग्राहक 

सध्या, ईपीएफओचे ७ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी, विशेषतः खाजगी क्षेत्रात, ईपीएफओकडे जमा होणारे पैसे ही सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना मानली जाते. दरमहा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफच्या नावाने एक निश्चित भाग कापला जातो. पीएफमध्ये योगदान नियोक्ता करतो आणि त्याची अनेक कारणे आहेत. 

नोकरी गेल्यास, घर बांधणे किंवा खरेदी करणे, लग्न करणे, मुलांचे शिक्षण किंवा निवृत्ती अशा परिस्थितीत कर्मचारी पीएफचे पैसे काढू शकतात. यामुळे अनेकांचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि वेगवेगळ्या परिस्थितीत ईपीएफओच्या वाढत्या व्याज दरामुळे हातभारही लागू शकतो अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

3 दिवसांत काढू शकाल पीएफमधून 1 लाख रुपये; तुम्हाला माहितीये का ‘हे’ नियम!

Web Title: Epfo may hike interest rate on provident fund for 7 crore subscribers in cbt meeting business good news for workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • Business News
  • EPFO
  • Rate Hike

संबंधित बातम्या

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?
1

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?

PPF Investment: चहाच्या एका कपाएवढी बचत अन् मुलगा होईल करोडपती! PPF चा हा फॉर्म्युला जाणून घ्या
2

PPF Investment: चहाच्या एका कपाएवढी बचत अन् मुलगा होईल करोडपती! PPF चा हा फॉर्म्युला जाणून घ्या

Noel Tata: 150 वर्षात पहिल्यांदाच बदलणार टाटा समूहाची काम करण्याची पद्धत, नोएल यांनी स्वतः दिले संकेत
3

Noel Tata: 150 वर्षात पहिल्यांदाच बदलणार टाटा समूहाची काम करण्याची पद्धत, नोएल यांनी स्वतः दिले संकेत

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी
4

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.