Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Everest Masala Ban : तुमच्या किचनमधून गायब होणार एव्हरेस्ट मसाला? FSSAI ने जारी केली कडक नोटीस, प्रकरण काय?

Everest Masala Ban : प्रसिद्ध भारतीय मसाला ब्रँड Everest अडचणीत सापडला आहे. काही देशांमध्ये मसाल्यांवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर आता भारतातील अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमच्या किचनमधून गायब होणार एव्हरेस्ट मसाला?
  • FSSAI ने जारी केली कडक नोटीस
  • हिंगामध्ये पण भेसळ, प्रकरण काय?
Everest Masala Ban : टेस्ट में बेस्ट म्हणत सगळ्यांच्या स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा मसाला एव्हरेस्ट मसाला. पण तुमच्या किचनमध्ये दिसणारा हा मसाला आता गायब होणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आमि मानक प्राधिकरण FSSAI ने एव्हरेस्टच्या काही उत्पादनांच्या तपासणीसंदर्भात कठोर कारवाई केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि आता तुम्हाला तुमच्या आवडीचा मसाला मिळणारच नाही का? ( Everest Masala Ban )

Penny Stock : काय सांगताय? 5 व्यांदा मिळतोय बोनस शेअर्स, 1 शेअरवर 7 शेअर्स फ्री; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक?

FSSAI ने केलेल्या तपासणीत, त्यांच्या हिंगावरील चुकीच्या लेबलिंगसोबतच, गुणवत्तेशी संबंधित काही दोषही आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त, एव्हरेस्ट कंपनीच्या एग करी मसाला, चिकन मसाला आणि गरम मसाल्यामध्येही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचं आढळून आले आहे. या घटनेनंतर, अन्न नियामकाने कंपनीला नोटीस बजावली आहे.

ग्राहकाच्या तक्रारीनंतर देशभरातील प्रमुख ब्रँडच्या हिंगची तपासणी करणाऱ्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या बाजार सर्वेक्षणात एव्हरेस्ट आणि एलजी ब्रँडच्या कंपाउंडेड हिंगचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणने मुंबईतील दोन्ही कंपन्यांच्या युनिटमधून घेतलेल्या नमुन्यांच्या आधारे विक्री प्रतिबंधाचे आदेश दिले आहेत.

Everest च्या या मसाल्यांवर प्रश्न

FSSAI च्या कारवाईत एव्हरेस्टच्या हिंगामध्ये गडबड जाणवली आहे. त्यावर चुकीचे लेबल लावण्यात आले होते आणि ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे वर्णन केले होते. इतकेच नाही, तर या मसाल्यांनी नियमांचेही उल्लंघनही झालं होतं. यामध्ये पुढील मसाले दोषी निघाले.

  • एग करी मसाला
  • चिकन मसाला
  • गरम मसाला
  • लालजी गोधू अँड कंपनीलाही कथित उल्लंघनाबद्दल इशारा देण्यात आला आहे.

हिंगामध्ये काय आढळलं?

कंपाउंडेड हिंगमध्ये कच्ची हिंग, गम अरेबिक, स्टार्च आणि पीठ यांचे मिश्रण करण्यास नियमांनुसार परवानगी आहे. मात्र, अंतिम उत्पादनात किमान ५ टक्के अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्ट असणे बंधनकारक आहे. एव्हरेस्ट आणि एलजीच्या तपासलेल्या नमुन्यांमध्ये हे प्रमाण केवळ ० ते ३ टक्के आढळले. म्हणजेच आवश्यक कच्च्या हिंगचे प्रमाण नियमांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याचे प्रयोगशाळा तपासणीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, एलजीच्या मुंबईतील युनिटमधून घेतलेल्या कच्च्या हिंगच्या सहा प्रकारांमध्येच १५ ते ३२ टक्के स्टार्च आढळला. कच्च्या हिंगमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्तीत जास्त १ टक्का असणे अपेक्षित आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान मुंबईतील एव्हरेस्ट आणि एलजी युनिटसह गुजरातमधील एव्हरेस्टच्या युनिटची संयुक्त तपासणी करून नमुने घेण्यात आले. हे नमुनेही निकृष्ट ठरल्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणने विक्री थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कंपन्यांना सुधारात्मक कृती आराखडा सादर करण्यास आणि बाजारातील निकृष्ट उत्पादनांचा स्वेच्छेने परतावा घेण्याचा सल्ला दिला आहे.

खाद्यपदार्थांवर नवीन लेबल

ही कारवाई अशा वेळी होत आहे, जेव्हा FSSAI ने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांसाठी पॅकच्या पुढील बाजूस एक नवीन चेतावणी लेबल प्रस्तावित केले आहे. पॅकेजच्या पुढील बाजूस एक चमकदार लाल रंगाचे षटकोनी चिन्ह लावण्याची योजना आहे. हे चिन्ह ग्राहकांना साखर, मीठ किंवा सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ सहजपणे ओळखण्यास मदत करेल. याचा अर्थ असा की, कोणतेही उत्पादन खरेदी करताना, ग्राहक केवळ पॅकेज पाहून त्यातील धोके सहजपणे समजू शकतील.

काही नियमांबद्दल चिंता व्यक्त

अन्न उद्योगानेही नवीन लेबलिंग नियमांबद्दल काही चिंता व्यक्त केली आहे. कोका-कोला, नेस्ले आणि पेप्सिको यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधी गटांनी प्रस्तावित प्रणालीच्या काही पैलूंवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न व्यवसायात गुंतलेल्यांना केवळ नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित न राहण्याचे आवाहन केले आहे.

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Web Title: Everest masala ban quality concerns and fssai notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Bad Quality Food
  • FSSAI

संबंधित बातम्या

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
1

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी
2

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Fake Paneer Ban News : देशभरात पनीरवर येणार बंदी? राज्यांनंतर केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल; बनावट पनीरवर कडक कारवाई
3

Fake Paneer Ban News : देशभरात पनीरवर येणार बंदी? राज्यांनंतर केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल; बनावट पनीरवर कडक कारवाई

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड
4

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.