Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? वाचा… सविस्तर

महाराष्ट्र, झारखंड या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकते, अशी माहिती अलीकडेच समोर आली होती. त्यानंतर तिन्ही तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 15, 2024 | 07:55 PM
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? वाचा... सविस्तर

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? वाचा... सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

इराण-इस्रायलच्या संघर्षादरम्यान भडकलेले कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. क्रूड ऑईल प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली आले आहे. दिवाळी काही दिवसांनर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने ही आशा धुसर झाल्याचे दिसत आहे.

ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ४.२९ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ७४.१४ डॉलर वर व्यापार करत आहे. तर डब्लूटीआय क्रूड ४.५४ टक्क्यांच्या घसरणीसह ७०.४८ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील या घसरणीचा सर्वात मोठा दिलासा तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांना मिळाला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१५) ऑक्टोबरच्या ट्रेडिंग सत्रात तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

हे देखील वाचा – सोने तारण कर्ज कसे घ्यावे? नेमकी काय काळजी घ्यावी; वाचा… संपूर्ण माहिती!

एचपीसीएल-आयओसीचे शेअर्स वधारले

तिन्ही तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ही केवळ कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याशी जोडलेली नाही. तर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे हे देखील शेअर्सच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. वृत्तानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये १० ते १२ रुपये प्रति लिटर फायदा होत होता. अशा स्थितीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीशी कपात होण्याची शक्यता होती.

मात्र, तसे झाले नाही, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. एचपीसीएलचा शेअर ४.६८ टक्क्यांच्या वाढीसह ४२४.८० रुपयांवर व्यवहार करत आहे. बीपीसीएलचे शेअर्स २.२९ टक्क्यांच्या वाढीसह ३४८ रुपयांवर होते, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे शेअर्स १.४२ टक्क्यांच्या वाढीसह १६७.७५ रुपयांवर होते.

आचार संहिता लागू

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर २०२४) महाराष्ट्र, झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी इंधन दरात कपात होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ही शक्यता तूर्तास संपुष्टात आली आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

Web Title: Fall in crude oil prices will petrol diesel become cheaper before diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 07:55 PM

Topics:  

  • Crude Oil Prices
  • Petrol Prices

संबंधित बातम्या

पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त! ‘या’ ठिकाणी 20 रुपयात मिळते 8 लिटर पेट्रोल, आश्चर्यकारक अहवाल
1

पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त! ‘या’ ठिकाणी 20 रुपयात मिळते 8 लिटर पेट्रोल, आश्चर्यकारक अहवाल

Saudi Arabia Faces $220 Billion- मोदी सरकारचा धाडसी निर्णय! सौदी अरेबियाला $220 अब्जांचा जबरदस्त झटका! जाणून घ्या संपूर्ण  प्रकरण
2

Saudi Arabia Faces $220 Billion- मोदी सरकारचा धाडसी निर्णय! सौदी अरेबियाला $220 अब्जांचा जबरदस्त झटका! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

जुलै २०२५ मध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ८.७ टक्के घट, रशियावरील अवलंबित्वामुळे संकट आणखी वाढले
3

जुलै २०२५ मध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ८.७ टक्के घट, रशियावरील अवलंबित्वामुळे संकट आणखी वाढले

Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…
4

Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.