सोने तारण कर्ज कसे घ्यावे? नेमकी काय काळजी घ्यावी; वाचा... संपुर्ण माहिती!
कर्जाची गरज, व्याजाचा दर, परतफेडीचा कालावधी हेच काही प्रमुख घटक आहेत. जे तुम्हाला तुमच्या आर्थिक अडीअडचणींच्या वेळी आधार देण्यासाठी सर्वोत्तम सुवर्ण कर्ज शोधण्यात मदत करतील. सोन्यावर कर्जासाठी अर्ज दाखल करताना तुम्हाला हे खालील महत्वाचे घटक माहीत असणे आवश्यक आहे.
• योग्य सुवर्ण कर्ज शोधताना विविध कर्जपुरवठादारांची तुलना करणे आवश्यक आहे.
• तुमच्या सुवर्ण सोन्याची शुध्दता ही 18 ते 24 कॅरेट दरम्यान असणे आवश्यक आहे.
• सुवर्ण कर्जासाठी अर्ज दाखल करताना तुम्ही 18 ते 70 या वयोगटात असणे आवश्यक असून, तुमच्याकडे सर्व केवायसी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
• सुवर्ण कर्जासाठी अर्ज दाखल करण्यापुवी कर्ज पुरवठादाराची विश्वासार्हता तपासणे अतिशय आवश्यक आहे.
आरबीआयतर्फे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, सुवर्ण कर्ज पुरवठादार कंपन्या २० हजार रुपयेपर्यंतच रोख स्वरुपात रक्कम वितरीत करु शकतात. कर्जाची उर्वरित रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर कर्जाच्या रक्कमेची ग्राहक परतफेड करत असताना कर्जपुरवठादार कंपनी कर्जदार ग्राहकांकडून फक्त २० हजार रुपयांपर्यंतच रोख स्वरुपात रक्कम स्वीकारू शकते. उर्वरित रक्कम ही बँक खात्यातूनच त्यांच्याकडे परत आली पाहिजे, असा दंडक आहे.
सोन्याची शुध्दता
कर्जदार व्यक्तीला कर्जपुरठादार कंपनीकडून अधिकतम प्राप्त होऊ शकणारे कर्ज हे सोन्याच्या शुध्दतेवर अवलंबून असते. तुमच्याकडे असलेले सोन्याचे दागिने हे प्रामुख्याने 18 कॅरेट किंवा त्यापेक्षा अधिक शुध्दतेचे असणे अतिशय महत्वाचे आहे. याचबरोबर कर्जपुरवठादाराच्या कर्ज-मूल्य या गुणोत्तराकडे तुम्ही जरुर लक्ष द्या. हे गुणोत्तर तारण दागिन्यांवर तुम्हाला अधिकाधिक किती कर्ज मिळू शकेल, हे निश्चित करते. जर कंपनी हे एलटीव्ही गुणोत्तर 75 टक्के इतके निश्चित करत असेल आणि तुमच्याकडे 18 ते 25 कॅरेटदरम्यानचे सोने असेल तर तुम्हाला निश्चितच समाधानकारक रक्कम मिळू शकेल. कर्जाच्या रक्कमेसाठी अर्ज करताना तुमच्या सोन्याची शुध्दता स्थानिक सुवर्णपेढीतून तपासून घ्या.
(फोटो सौजन्य – istock)
काय आहे पात्रता
कर्जदारासाठी पात्रतेचे असलेले निकष तुम्ही पूर्ण करतात का, हे तपासा. या निकषांमध्ये खालील नियमांचा समावेश आहे.
• कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसाठी वयाची मूलभूत अट ही 18 ते 70 वर्ष अशी आहे.
• कर्ज घेणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
• तारणासाठी दिले जाणारे सोने हे 18 कॅरेट किंवा त्यापेक्षा अधिक कॅरेटचे असणे आवश्यक आहे.
• उत्पन्नाचा स्त्रोतः पगारदार किंवा स्वयंरोजगारित हवा आहे.
याव्यतिरिक्त, तुम्हाला अर्जासोबत काही केवायसी कागदपत्र सादर करणे आवश्यकता असते. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक स्टेटमेंट आणि पासपोर्ट यांचा समावेश असू शकतो. अर्ज यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी या कागदपत्रांच्या भौतिक आणि डिजिटल प्रती सुरक्षित करणे अत्यावश्यक आहे.
परतफेडीच्या अटी
सुवर्ण कर्जामध्ये परतफेडीच्या सोप्या अटी असतात. तुम्हाला वित्तसंस्थेने प्रदान केलेले परतफेडीचे पर्याय समजून घ्यावे लागतील. हे पर्याय नेहमी तुमचे उत्पन्न आणि सध्याच्या आर्थिक स्थितीशी जुळले पाहिजेत. बहुतांश सुवर्ण कर्जपुरवठादार पुढील तीन परतफेडीचे पर्याय देत असतात:
• ईएमआयच्या माध्यमातून मासिक परतफेड
• विशिष्ट कालावधीनंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज हे एकरकमी स्वरुपात कर्जदार व्यक्ती परतफेड करु शकतो.
• अन्य पर्यायात दरमहा व्याजाचा हप्ता देता येतो आणि मूळ मुद्दलाची परतफेड ही कर्जाची मुदत संपताना करता येते.
परतफेडीचे लवचिक असे पर्याय देणाऱ्या कर्जपुरवठादाराचीच निवड अर्जदाराने कधीही केली पाहिजे.
काय आहेत व्याजाचे दर
अर्जदाराने सोन्याच्या कर्जावरील व्याजदरांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परवडणारे व्याजदर कर्जाची परतफेड सुज्ञपणे हाताळण्यास त्याला नेहमी मदत करत असतात. आरबीआयच्या आदेशानुसार व्याजदर बदलत असतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर जाणून घ्या. कोणतीही बाब गृहीत धरू नका, त्याबाबत नेहमी चौकशी करत रहा. प्रदात्याचे जोखीम मूल्यांकन, एलटीव्ही प्रमाण आणि कर्जाचा कालावधी देखील व्याजदरांवर परिणाम करतात. यासंबंधात लागू होणारे शुल्क देखील तपासून घ्या.
कर्जाचा कालावधी
परतफेड सोयीची ठरण्यासाठी कर्जाचा कालावधी हा विचारात घेतला जाणारा अतिशय महत्वाचा घटक आहे.
कर्जपुरवठादाराची विश्वासार्हता
कोणताही घोटाळ्याचा इतिहास नसलेला म्हणजेच अतिशय विश्वासार्ह कर्जपुरठादार सुवर्ण कर्ज घेण्यासाठी निवडणे हे अतिशय महत्वाचे असते. कारण तुम्हाला आवश्यक असलेल्या कर्जाच्या मोठ्या निधीसाठी तुम्ही त्यांच्याकडे तुमचे सोने तारण ठेवणार आहेत. त्यामुळे तुम्ही कर्जाची परतफेड केल्यानंतर संबंधित वित्तकंपनी तुमचे सोने तुम्हाला परत करेल, याबाबतची खात्री करुन घेणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी खालील घटकांवर लक्ष केंद्रीत करा:
• कंपनी आरबीआयकडे नोंदणीकृत असल्याचे तपासून घेणे.
• त्यांच्याबाबत ग्राहकांनी ऑनलाइन माध्यमातून नोंदविलेले मत आणि प्रशंसापत्रे वाचा
• त्यांच्याकडे असलेली तारणाबाबतची सुरक्षा वैशिष्ट्ये समजून घ्या
सोने तारण ठेवण्यापुर्वी महत्वाच्या सूचना
सहजसोप्या आणि यशस्वी व्यवहाराची खात्री निश्चित करण्यासाठी या खालील सूचनांचा जरूर अवलंब करा:
• तुमच्या घरापासून तीन ते पाच किमी अंतरावर असलेली सुवर्ण कर्जपुरवठादापर कंपनी निवडा
• सोनेमालकाने तारण ठेवण्याची प्रक्रिया वेगाने हाताळली पाहिजे.
• फक्त दागिने स्वीकारले जातात. कॉईन्स अथवा सोन्याचे बार स्वीकारले जात नाही. अधिक सोने असल्यास मंजुरीची शक्यता अधिक असते.
• सोने तारणाच्या पावत्या सुरक्षित ठेवा, कारण त्यात तारण ठेवलेल्या सोन्याची माहिती नमूद केलेली असते.
• परतफेडीची तारीख, फेरनुतनीकरणाच्या अटी आणि परतफेड चुकल्यास लिलावाची शक्यता या बाबींकडे बारकाईने लक्ष देत रहा.
एकूण सारांश
सुवर्ण कर्ज कसे घ्यायचे आणि त्याच्याशी संबंधित घटक जाणून घेत असताना, कर्जाची योग्य रक्कम आणि कर्जपुरवठादार निवडताना तुमच्या आर्थिक गरजांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आपले आर्थिक व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आवाका राखणे आणि अनावश्यक खर्च कमी करणे यासारख्या विवेकपूर्ण आर्थिक सवयी जोपासा. अशा प्रकारे, सुवर्ण कर्जासाठी ईएमआय भरणे अधिक सोयीचे होऊ शकते. कर्ज हाताळण्यासाठी आणि कर्ज पुरवठादार निवडण्याबद्दल अधिक माहिती होण्यासाठी तुम्ही नेहमी इतर कर्ज अर्जदारांचा सल्ला घेऊ शकतात. असे श्रीराम फायनान्सचे सह व्यवस्थापकीय संचालक जी एम जिलानी यांनी सांगितले आहे.