
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Sugar Price Drop : अरे वाह… साखरेच्या दराबाबत आली मोठी बातमी! दसरा-दिवाळीत भाव आणखी उतरणार?
या गैरसोयीवर उपाययोजना करण्यासाठी NHAI ने एक योजना विकसित केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत अस्वच्छ शौचालयांची माहिती देणाऱ्या लोकांना थेट 1000 रुपये रिचार्ज मिळेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची योजना काय आहे.
ही योजना सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या ‘क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज’चा एक भाग आहे. NHAI ने ही योजना ३० जून २०२७ पर्यंत वाढवली आहे. अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी NHAI ला अस्वच्छ शौचालयांची माहिती देऊन फास्टॅग रिचार्ज मिळवले आहेत.
Report & Get Rewarded!
To enhance commuter convenience and hygiene standards across National Highways, NHAI is conducting the ‘Clean Toilet Picture Challenge’ till 30th June 2026. The initiative encourages National Highway users to report any unclean toilet facilities at Toll… pic.twitter.com/fu3cmstoSZ — NHAI (@NHAI_Official) February 12, 2026
२०२६ मध्ये आतापर्यंत, अस्वच्छ शौचालयांची तक्रार करणाऱ्या ४२९ प्रवाशांना ₹१,००० चा फास्टॅग रिचार्ज मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणारे सर्व प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यात सहभागी होण्यासाठी, त्यांनी हायवेयात्रा मोबाईल ॲप वापरून, जिओ-टॅग केलेला एक स्पष्ट फोटो आणि वेळ नोंदवलेला फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
वापरकर्त्यांना त्यांची मूलभूत माहिती देखील द्यावी लागेल. फोटो पाठवताना नाव, ठिकाण, वाहन नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सोबत पाठवा. त्याबरोबर तुमचा वाहन नोंदणी क्रमांक पाठवायला विसरु नकात. त्यांना ₹१,००० चं थेट रिचार्ज मिळेल.
हे बक्षीस फास्टॅग रिचार्जच्या स्वरूपात मिळेल, जे लिंक केलेल्या वाहन नोंदणी क्रमांकाच्या खात्यात जमा केले जाईल. संपूर्ण योजनेदरम्यान एका वाहनाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळेल.
एकाच सुविधेसाठी एकापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या असल्यास, पहिल्या तक्रारीला लाभ मिळेल. ही योजना फक्त NHAI अंतर्गत असलेल्या शौचालय सुविधांना लागू आहे. NHAI ने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.