Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच

फेडएक्स (फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन), जगातील अग्रगण्य एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी, हिने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत भागीदारी करत “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” या डिजिटल ब्रँड कॅम्पेनची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 06:30 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू
  • स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी, रुतुराज गायकवाड आणि उर्विल पटेल प्रमुख भूमिकेत झळकणार
  • मागील वर्षातील यशस्वी उपक्रमाचा विस्तार म्हणून हा कॅम्पेन पुढे नेण्यात आला
फेडएक्स (फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन), जगातील अग्रगण्य एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी, हिने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत भागीदारी करत “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” या डिजिटल ब्रँड कॅम्पेनची घोषणा केली आहे. या कॅम्पेनअंतर्गत तीन डिजिटल फिल्म्स सादर करण्यात आल्या असून त्यामध्ये सीएसके चे स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी, रुतुराज गायकवाड आणि उर्विल पटेल प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. फेडएक्स–सीएसके सहकार्याचा हा सलग दुसरा वर्ष असून, मागील वर्षातील यशस्वी उपक्रमाचा विस्तार म्हणून हा कॅम्पेन पुढे नेण्यात आला आहे.

भारतीय रिटस् मार्केटची दमदार घोडदौड; परतावा आणि विकासाच्या बाबतीत आशियाई देशांना टाकले मागे, अनॅरॉक अहवाल

क्रिकेट हे केवळ खेळ नसून ते संस्कृती

भारतामध्ये क्रिकेट हे केवळ खेळ नसून ते संस्कृती, व्यापार आणि समुदाय यांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे. या पार्श्वभूमीवर “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” कॅम्पेन फेडएक्सकडून विविध व्यवसायांच्या गरजांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक ‘एंड-टू-एंड’ लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सची प्रभावी मांडणी करते. क्रिकेटच्या संदर्भातून प्रेरणा घेत, या कॅम्पेनमध्ये फेडएक्सला ‘ऑल-राऊंडर’ म्हणून सादर करण्यात आले आहे—ज्यात चपळता, विश्वासार्हता आणि विशेष कौशल्य यांचा संगम आहे. ऑटोमोबाईल, हेल्थकेअर आणि प्रीमियम ई-कॉमर्ससारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये फेडएक्स व्यवसायांना अमेरिकाज, युरोप आणि आशियातील प्रमुख व्यापार मार्गांशी सहजपणे जोडण्यास सक्षम करते. सीएसके खेळाडूंच्या माध्यमातून हा कॅम्पेन भारतीय व्यवसायांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याची सुलभता अधोरेखित करतो.

चेन्नई सुपर किंग्ससोबतचे आमचे सातत्यपूर्ण सहकार्य

फेडएक्स (एमइआयएसए क्षेत्र)चे मार्केटिंग, कस्टमर एक्स्पीरियन्स आणि एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत ताटीवाला म्हणाले, “फेडएक्स जटिल लॉजिस्टिक्स प्रक्रियांना सुलभ करण्यासाठी बांधील आहे, ज्यामुळे व्यवसायांना त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येते. चेन्नई सुपर किंग्ससोबतचे आमचे सातत्यपूर्ण सहकार्य या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. आमच्या सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे आम्ही वस्तूंची जलद, स्मार्ट आणि विश्वासार्ह हालचाल सुनिश्चित करतो, ज्यामुळे व्यवसाय अधिक चपळ आणि स्पर्धात्मक बनतात.”

दुसऱ्या वर्षीही पुढे चालू ठेवताना आम्हाला अत्यंत आनंद

चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. के. एस. विश्वनाथन म्हणाले, “फेडएक्ससोबतची आमची भागीदारी दुसऱ्या वर्षीही पुढे चालू ठेवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘द मूव्ह इंडिया नीड्स’ हा कॅम्पेन प्रगती, सातत्य आणि पुढे जाण्याच्या भावनेचे प्रतीक आहे, जो आमच्या संघ आणि चाहत्यांशी दृढपणे जोडलेला आहे. आगामी हंगामांमध्ये या यशस्वी सहकार्याला अधिक बळ देण्याची आम्ही उत्सुकता बाळगतो.”

या डिजिटल फिल्म्स सोशल मीडिया तसेच विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित करण्यात आल्या असून, त्या देशभरातील क्रिकेटप्रेमी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील. इच्छुक प्रेक्षक या फिल्म्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकतात.

HDFC बँकेचा मोठा दणका! 12 बड्या अधिकाऱ्यांचं Increment रोखलं, Employee Stock Option ही रद्द; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Fedex kicks off the second phase of its partnership with chennai super kings launches three special digital films

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Business News
  • Chennai Super Kings
  • CSK
  • FedEx
  • Marathi News

संबंधित बातम्या

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! नवरा हवा म्हणून थेट Google Form! ३६ वर्षीय महिलेच्या पोस्टला २४० हून अधिक प्रतिसाद
1

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! नवरा हवा म्हणून थेट Google Form! ३६ वर्षीय महिलेच्या पोस्टला २४० हून अधिक प्रतिसाद

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक
2

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
3

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
4

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.