लोकांनी कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहावे FedEx चा इशारा, फ्रॉड टाळण्यासाठी दिल्या 'या' महत्वाच्या टिप्स
फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”), जगातील एक सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी भारतातील नागरिकांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावे होणाऱ्या तसेच इतर फसवाफसवीच्या कारवायांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे. फेडएक्सने सांगितले की, काही लोक कंपनीच्या नावाने फसवाफसवी करत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या नावाने विविध प्रस्ताव, ओपनिंग्स, किंवा पॅकेजेसची ऑफर दिली जातात. यामुळे अनेक लोकांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होऊ शकतो.
फेडएक्सने यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना फसव्या इमेल्स किंवा फोन कॉल्सकडून वाचविण्यासाठी, कंपनीने केवळ अधिकृत मार्गदर्शनाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद ऑफर्स किंवा संदेशांवर त्वरित दुर्लक्ष करावे आणि त्यासंबंधी कोणतीही माहिती फेडएक्सला कळवावी. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कंपनी सतत प्रयत्नशील आहे.
हे घोटाळेबाज आपण कुरियर प्रतिनिधी, फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आणि असा खोटा आरोप करतात की तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आहेत.
जे बळी पडतात त्यांची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्याशी गाठ घालून दिली जाते, जे कायदेशीर कार्यवाहीची किंवा डिजिटल अटकेची धमकी देतात आणि तो त्रास टाळण्यासाठी तत्काळ पैशांची मागणी करतात.
एकदा पैसे हस्तांतरित केल्यानंतर हे घोटाळेबाज गायब होतात आणि तुमचे मात्र मोठे नुकसान होते.