Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा

Foreign Investment : मिडल ईस्टच्या बड्या उद्योगपतींची आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूक प्राप्त झाल्यानंतर एका प्रमुख भारतीय बँकेच्या आर्थिक कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल १८ टक्क्यांची मोठी झेप नोंदवली गेली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 02:34 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेखांच्या हाती सूत्रे, बँकेचं नशीब बदललं!
  • नफ्यात 18 % दणदणीत वाढ
  • अहवालात मोठा खुलासा
Foreign Investment : मिडल ईस्टच्या बड्या उद्योगपतींची आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूक भारतातील बड्या बँकेचं नशीब पलटवून गेलं. त्यांची ही गुंतवणूक प्राप्त झाल्यानंतर एका प्रमुख भारतीय बँकेच्या आर्थिक कामगिरीत मोठी आणि कमालीची सुधारणा झाली आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात मोठी माहिती समोर आली. दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल १८ टक्क्यांची मोठी झेप नोंदवली गेली आहे. नेमकी कोणती बँक आहे जिला इतका मोठा फायदा मिळाला? आणि विदेशी गुंतवणुकीनंतर ( Foreign Investment ) बँकेच्या बिझनेस मॉडेलमध्ये काय बदल झाले?

E20 Petrol: ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी? सोशल मीडियावरील दाव्यांचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य; पाहा केला खुलासा

भारताच्या ८३ वर्षे जुन्या RBL बँकेने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०२५-२६ हे आर्थिक वर्ष बँकेसाठी ऐतिहासिक ठरलं आहे. बँकेच्या ८३ व्या वार्षिक अहवालानुसार, दुबईच्या अग्रगण्य बँकिंग ग्रुपने एमिरेट्स एनबीडी ENBD ने RBL बँकेत ६०% हिस्सा विकत घेतला आहे. याचा अर्थ आता आरबीएल बँकेत दुबईच्या शेखांचे वर्चस्व निर्माण झालं आहे. त्यामुळे या बँकेत बरेच मोठे बदल झाले. याचा परिणाम त्यांच्या वार्षिक अहवालात दिसून आला.

संयुक्त अरब अमिरातीच्या UAE एमिरेट्स एनबीडीने आरबीएलमध्ये २६,०१६ कोटी रुपयांची प्राथमिक भांडवली गुंतवणूक केली आहे, जी आतापर्यंत भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक FDI आहे.

विक्रमी नफा आणि व्यवसायात वाढ

RBL बँकेने या आर्थिक वर्षात दमदार आर्थिक कामगिरी केली आहे. निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या ₹६९५ कोटींच्या तुलनेत १८.३% वाढून ₹८२२ कोटी झाला आहे. बँकेच्या एकूण व्यवसायानेही ₹२.५ लाख कोटींचा म्हणजे ₹२.५ ट्रिलियनचा टप्पा ओलांडला असून, वार्षिक 24 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना ₹१० दर्शनी मूल्याच्या प्रति शेअर ₹१ (१०%) लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

NPA मध्ये लक्षणीय घट, मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा

बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. एकूण Gross NPA मध्ये गेल्या वर्षीच्या २.६०% वरून १.४५% पर्यंत कमी झाली आहे. निव्वळ अनुत्पादक मालमत्ता (Net NPA) देखील ०.२९% वरून ०.३९% पर्यंत कमी झाली आहे, यातून बँकेचे मजबूत जोखीम व्यवस्थापन धोरण दर्शवते.
RBL बँकेने आपल्या डिजिटल क्षमता वाढवण्यासाठी ‘मायबँक’ ॲप सुरू केले आहे आणि ‘प्रोजेक्ट ऑटोमॅजिका’च्या माध्यमातून AI-आधारित ग्राहक सेवादेखील सुरु केली आहे. बँकेचे जाळे आता २८ राज्यांमध्ये ६२८ शाखांपर्यंत विस्तारलं गेलं आहे. बँकेने सुरक्षित किरकोळ कर्जांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यात ३६% ची दमदार वाढ दिसून आली आहे.

२ सप्टेंबरला होईल 83 वी AGM

RBL बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल. या सभेत बँकेच्या नवीन संचालक मंडळावरील नियुक्त्या आणि आर्थिक निकालांवर चर्चा केली जाईल.

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू

(Disclaimer : येथे शेअर बाजाराची माहिती दिली आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. नवराष्ट्र बिझनेस गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Web Title: Foreign investment profit jump 18 percent indian bank report card improves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Bank
  • bank accounts
  • Business News
  • investment
  • Marathi News
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.