Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

National Insurance Apprentice Jobs: नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने (NICL) 'नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम' (NATS) अंतर्गत देशात एकूण २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून, इच्छुक उमेदवार १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 11:51 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • नॅशनल इन्श्युरन्स कंपनीत २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांची भरती जाहीर
  • महाराष्ट्रात किती जागा भरल्या जाणार?
  • वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता
National Insurance Apprentice Jobs: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या आणि विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने ‘नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’ (NATS) अंतर्गत विविध राज्यांतून एकूण २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना नॅशनल इन्श्युरन्स कंपनीत १ वर्षासाठी अप्रेंटिसशिप करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत NATS पोर्टलमध्ये आपले अर्ज दाखल करू शकतात.

महाराष्ट्रात किती जागा भरल्या जाणार?

या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण २०० रिक्त जागा भरल्या जाणार असून, त्यामध्ये राज्यानुसार विविध जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी १० जागांवर अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय आसाममध्ये ३०, गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी २२, उत्तर प्रदेशमध्ये १४, मध्य प्रदेशमध्ये १२, तर पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तराखंड, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांतही योग्य त्या रिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जाची छाननी केल्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल, ज्याची माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल.

UPSC CSE 2026 Mains Result: सेवेत असताना पुन्हा यूपीएससी देता येणार का? रँक सुधारण्याबाबत ‘हे’ नवीन नियम करण्यात आले जारी

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२६ रोजी किमान २१ वर्षे ते कमाल ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलताना, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात नियमित पदवी पूर्ण केलेली असावी. या प्रशिक्षणादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे, ज्यामध्ये कंपनीचा हिस्सा आणि डीबीटीद्वारे सरकारचा हिस्सा जमा केला जाईल. या भरती आणि अर्जाविषयी अधिक माहितीसाठी उमेदवार नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या किंवा NATS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या या भरती मोहिमेत एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत?

    Ans: या भरती मोहिमेच्या माध्यमातून देशभरात एकूण २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस जागा भरल्या जाणार असून, त्यापैकी महाराष्ट्रासाठी १० जागा आहेत.

  • Que: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६ आहे.

  • Que: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किती विद्यावेतन दिले जाईल?

    Ans: प्रशिक्षण काळात निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० रुपये विद्यावेतन दिले जाईल.

Web Title: National insurance apprentice jobs 2026 apply online sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Career
  • job offer
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mumbai Redevelopment: मुंबईत पुनर्विकासाची लाट; भाडे बाजारपेठेला तेजी, घरांच्या परताव्यात वाढ
1

Mumbai Redevelopment: मुंबईत पुनर्विकासाची लाट; भाडे बाजारपेठेला तेजी, घरांच्या परताव्यात वाढ

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर
2

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवला
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवला

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले
4

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.