
Ration Card Benefits: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्यापैकी बरेच जण रेशन कार्डला हलक्यात घेतात. अरे ते फक्त धान्य आणायचं कार्ड आहे, असं आपल्याला वाटतं. पण खरं सांगायचं तर हेच एक कार्ड तुमच्या घराचं नशीब बदलू शकतं. मोफत गॅस मिळवायचा असेल किंवा 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत इलाज करायचा असेल, तर आधी रेशन कार्ड लागणारच. Ration Card Benefits:
रेशन कार्ड असेल तर तुम्हाला स्वस्तात किंवा मोफत धान्य मिळतं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यापलीकडे पण बरंच काही आहे. सरकारच्या मोठ्या-मोठ्या योजनांमध्ये रेशन कार्डशिवाय तुमचं नावच घेतलं जात नाही. म्हणजे कार्ड नसेल तर तुम्हाला योजनांचा फायदा मिळणारच नाही. म्हणून वेळ न घालवता ते काढून घेणं गरजेचं आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गरीब कुटुंबाला मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. पण फक्त मला गॅस पाहिजे म्हणून मिळत नाही. त्यासाठी काही कागदपत्रं लागतातच.
आधार कार्ड – तुमची ओळख आणि पत्ता यासाठी.
बँक खात्याची माहिती – कारण गॅसची सबसिडी थेट तुमच्या खात्यात येते.
रेशन कार्डची झेरॉक्स – यात तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांची नावं असली पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नावं नसतील तर अर्ज अडकेल.
दुसरी मोठी योजना म्हणजे पीएम जन आरोग्य योजना, म्हणजेच आयुष्मान कार्ड. याने मोठ्या आजारात 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलतं. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं तरी पैशाची काळजी नसते.पण हे आयुष्मान कार्ड काढायला पण रेशन कार्ड लागणारच. रेशन कार्ड नसेल तर आयुष्मान कार्ड बनतच नाही.
दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट
Ans: स्वस्त धान्याबरोबरच विविध सरकारी योजनांसाठी कुटुंबाचा पुरावा म्हणून त्याचा उपयोग होतो.
Ans: आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील आणि कुटुंबातील सदस्यांची नावे असलेली रेशन कार्डची प्रत आवश्यक आहे.
Ans: पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचे आरोग्य कवच मिळते.