Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Freebies Politics in India: १० हजार की ३० हजार? निवडणुकांतील मोफत आश्वासनांवर माजी RBI प्रमुखांचे कठोर वक्तव्य

भारतात निवडणुका जवळ येताच सरकारकडून जनतेला मोफत देणगी आणि रोख रकमेची आश्वासने दिली जातात. प्रत्येक पक्ष मोठी आश्वासने देत असल्याने माजी आरबीआय गव्हर्नर यांनी याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल सविस्तर वाचा..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 30, 2025 | 06:00 PM
१० हजार की ३० हजार? निवडणुकांतील मोफत आश्वासनांवर माजी RBI प्रमुखांचे कठोर वक्तव्य

१० हजार की ३० हजार? निवडणुकांतील मोफत आश्वासनांवर माजी RBI प्रमुखांचे कठोर वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:
  • मोफत देणगीचे राजकारण धोकादायक
  • माजी RBI प्रमुखांचे कठोर वक्तव्य
  • मोफत पैसे वाटणे म्हणजे राजकीय अपयश
 

Freebies Politics in India: सरकारकडून मिळणाऱ्या मोफत देणगी योजनेवर आरबीआयचे माजी गव्हर्नर यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. आणि भविष्यातील गंभीर मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. भारतात निवडणुका येताच जनतेला मोफत देणगी आणि रोख रकमेची आश्वासने दिली जातात. प्रत्येक पक्ष फक्त मोठी आश्वासने देतो. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल? तुम्ही कधी विचार केला आहे का? या गंभीर मुद्द्यावर, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी एक गंभीर दावा केला आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव म्हणतात की, राजकीय नेत्याच्या  या युक्त्या निवडणुका जिंकू शकतात, परंतु त्या योजना एक मजबूत राष्ट्र कधीच निर्माण करू शकत नाहीत. यासोबत, सुब्बाराव यांनी स्पष्टपणे केले की, मोफत सर्व काही देण्याचे आश्वासन म्हणजे प्रत्यक्षात राजकीय अपयशाची कबुली असल्याचेही म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आणि लोकांच्या जीवनमानात कायमस्वरूपी सुधारणा करण्यात सरकारे अपयशी ठरत असताना तेव्हा त्यांना अशा शॉर्टकटचा अवलंब करावा लागतो.

हेही वाचा : Top 10 Sensex Companies: भारतीय शेअर बाजारात तेजी! LIC आणि Airtel ला धक्का..; तर रिलायन्स आणि बजाज फायनान्स चमकले

या योजना धोकादायक प्रवृत्तीला पाणी घालतात. कारण, ती देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या गुंतवणूकीला अडथळा आणते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी स्वत:चा मुद्दा पटवून देण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश निवडणुकांचा हवाला दिला. बिझनेस टुडे आणि टीओआयच्या वृत्तांचा अहवाल सादर करत त्यांनी स्पष्ट केले की, एनडीएने बिहार निवडणुकीत महिलांना १०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तर विरोधी महाआघाडीने त्यांची बोली ३०,००० रुपयांपर्यंत वाढवली होती आणि प्रत्येक घरासाठी सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा : HDFC Bank Penalty: HDFC Bank ला RBI कडून झटका! बँकेला तब्बल ९.१ दशलक्ष रुपयांचा दंड..; व्याजदर आणि KYC नियमांमध्ये गोंधळ

सुब्बाराव यांच्या मते, ही आश्वासने कोणत्याही वास्तवाला धरून नव्हती; राजकीय वर्गाने सर्व आर्थिक गणिते आणि अर्थसंकल्पीय बाबी बाजूला ठेवून फक्त एकमेकांना मागे टाकण्याची शर्यत होती. या आश्वासनामुळे जनतेचा नेत्यांवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. यामुळे, रिकाम्या रोख आश्वासनांमुळे सरकारांवर दबाव येतो आणि राष्ट्र उभारणीचे खरे काम मागे पडत आहे.

Web Title: Freebies politics in india 10 thousand or 30 thousand former rbi chiefs strong statement on free promises in elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Retail Inflation in India: महागाई परत डोके वर काढतेय? नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईत पुन्हा उसळी
1

Retail Inflation in India: महागाई परत डोके वर काढतेय? नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईत पुन्हा उसळी

RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल
2

RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.