Garena Free Fire Max प्लेअर्ससाठी Garena ने जारी केले नवीन रिडीम कोड्स, फ्रीमध्ये रिवॉर्ड्स मिळवण्याची ही आहे सुवर्णसंधी
ऑनलाईन गेमिंगच्या दुनियेतील सर्वात मोठं नाव Garena ने फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी 23 जुलैसाठीचे रिडीम कोड जारी केले आहेत. या रेडिम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून अनेक आकर्षक रिवॉर्ड्स मिळवू शकतात. यामध्ये वेपन स्किन, इमोट, बंडल आणि कॅरेक्टर साख्या जबरदस्त गेमिंग आइटम्सचा समावेश असतो. जेव्हा प्लेअर्सना गेममध्ये हे गेमिंग आइटम्स पाहिजे असतात, तेव्हा त्यांना डायमंड खर्च करावे लागतात. पण Garena ने जारी केलेल्या रिडीम कोड्सच्या मदतीने कोणतेही डायमंड खर्च न करता प्लेअर्स हे गेमिंग आइटम्स मोफत मिळवू शकतात. याशिवाय युजर्सना हे गेमिंग आइटम्स मिळण्यासाठी कोणतेही टाक्स देखील पूर्ण करावे लागणार नाही.
प्लेअर्सना केवळ गरेनाच्या अधिकृत रिडेम्पशन वेबसाईटवर जावं लागणार आहे. त्यानंतर प्लेअर्स या वेबसाईटवर त्यांच्या फेसबुक किंवा गूगल आईडीने लॉगिन करू शकता. त्यानंतर तुम्ही Garena ने जारी केलेल्या रिडीम कोड्स तेथे दिसणाऱ्या रिडीम बॉक्समध्ये पेस्ट करू शकता. यानंतर काही वेळातच तुम्हाला वेपन स्किन, इमोट, बंडल आणि कॅरेक्टर सारखे आकर्षक रिवॉर्ड्स मिळणार आहेत. हे रिडीम कोड्स गेमिंगला अधिक मजेदार बनवतात आणि गेमर्सना कोणतेही डायमंड खर्च न करता आणि कोणतंही टास्क पूर्ण न करता जबरदस्त गेमिंग आइटम्स मिळवण्याची संधी देतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max मध्ये अनेक क्लासी गेमिंग आइटम्स उपलब्ध आहेत. यातीलच एक प्रसिद्ध गेमिंग आयटम म्हणजे पॉपुलर वेपन स्किन. प्लेअर्सना ही पॉपुलर वेपन स्किन मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड खर्च करावे लागतात. यामुळे प्लेअर्स ही पॉपुलर वेपन स्किन अनलॉक करण्यापूर्वी 10 वेळा विचार करतात. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पॉपुलर वेपन स्किन अगदी कमी डायमंडमध्ये खरेदी करू शकता. वेपन लूट क्रेट हा एक मार्ग आहे ज्याद्वारे कमी हिऱ्यांमध्ये वेपन स्किन मिळवता येते.
वेपन लूट क्रेटमध्ये Blizzard Brawl वेपन स्किन मिळणार आहे. या बंदूकीचा लूक खूप कूल आहे. यासह, मॅगझिनचा आकार आणि फायरचा वेग देखील वाढतो, ज्यामुळे गेममध्ये किल्स मिळवणे सोपे होते. विशेष म्हणजे, जेव्हा प्रतिस्पर्ध्याला नॉक आउट केले जाते तेव्हा एक स्पेशल अनाउंसमेंट देखील केली जाते.