Oppo K13 Turbo: 50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये ओप्पोची नवीन सिरीज लाँच, बजेट रेंजमध्ये आहे किंमत! जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Oppo ने त्यांची नवीन आणि बहुप्रतिक्षित K13 Turbo सिरीज सोमवारी चीनमध्ये लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Oppo K13 Turbo आणि K13 Turbo Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दोन्ही फोनमध्ये अनोखे डिझाईन आणि वेगवेगळे पावरफुल फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, या स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे. त्यामुळे जे लोकं नवीन आणि बजेट स्मार्टफोन शोधत आहेत, ज्यांना कूल डिझाईन पाहिजे आहे, त्या सर्वांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट आहे.
Oppo K13 Turbo स्मार्टफोन 12 GB रॅम+256 GB स्टोरेज, 16 GB + 256 GB आणि 12 GB + 512 GB अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम+256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 21,630 रुपये, 16 GB + 256 GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 24,000 रुपये आणि 12 GB + 512 GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 27,640 रुपये आहे. हा स्मार्टफोन व्हाइट, पर्पल आणि ब्लॅक कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Oppo चा K13 Turbo प्रो स्मार्टफोन देखील 12 GB रॅम+256 GB, 16 GB + 256 GB, 12 GB + 512 GB आणि 16 GB + 512 GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम+256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 24,000 रुपये, 16 GB + 256 GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 26,440 रुपये, 12 GB + 512 GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 28,840 रुपये आणि 16 GB + 512 GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 32,450 रुपये आहे. हा स्मार्टफोन सिल्वर, पर्पल आणि ब्लॅक कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासाठी प्री-ऑर्डर कंपनीच्या चीनमधील वेबसाइटद्वारे करता येतील. या स्मार्टफोन्सची विक्री 25 जुलैपासून सुरू होईल.
Oppo K13 Turbo, K13 Turbo Pro launched in China. Oppo K13 Turbo Pro specifications
– Snapdragon 8s Gen 4 | UFS 4.0 storage
– 80W charging supports QC, UFCS, PPS, PD protocols
– OIS for main camera
– RGB lighting for built-in cooling fan
– Wi-Fi 7 Oppo K13 Turbo specifications… pic.twitter.com/aMTsFR32cq — Anvin (@ZionsAnvin) July 21, 2025
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.80 इंच 1.5K (1,280×2,800 पिक्सेल्स) AMOLED फ्लेक्सिबल स्क्रीन 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240 Hz चा टच सँपलिंग रेट आणि 1,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल देण्यात आली आहे. K13 Turbo मध्ये MediaTek Dimensity 8450 हा प्रोसेसर आणि K13 Turbo Pro मध्ये Snapdragon 8s Gen 4 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड ColorOS 15.0 वर चालतो.
या स्मार्टफोनच्या ड्युअल रिअर कॅमेरा यूनिटमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16 गापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. Oppo K13 Turbo आणि K13 Turbo Pro मध्ये एक कूलिंग सिस्टम देण्यात आले आहे. ज्यामुळे सध्याच्या स्मार्टफोनच्या तुलनेत 20 टक्क्यांपर्यंत हीट कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. या कूलिंग सिस्टममध्ये इनबिल्ट फॅन, एयर डक्ट्स, 7,000 sq mm चा वेपर चेंबर आहे, या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 7,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80 W वायर्ड फास्ट चार्जिंगाल सपोर्ट करते. या फोन्समध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिेंट सेंसर देण्यात आला आहे.