Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

GenZ: कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतात पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींचे वय कमी होत असून 25 ते 30 वयोगटातील गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष 2024 ते 2026 दरम्यान 86 टक्क्यांनी वाढली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 05:21 PM
GenZचा Homebuyingकडे (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

GenZचा Homebuyingकडे (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 25–30 वयोगटातील गृहकर्जदार 86% वाढले
  • कोटकच्या गृहकर्ज ग्राहकांमध्ये Gen Zचा वाटा 6% वरून 9%
  • तरुण खरेदीदार लवकर घर घेण्याला आणि पहिल्या घराला आर्थिक प्रगतीची पायरी
 

Gen Z homebuyers India: दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहण्याची अपेक्षा असलेली पिढी आता वयाच्या ३० वर्षांपूर्वीच घरे खरेदी करत आहे कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील पहिले घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे, तसेच गृहकर्ज बाजारपेठेत जेन झेड सर्वात वेगाने वाढणारा घटक म्हणून समोर येत आहे.

तरुणाईची घराकडे धाव

बँकेच्या आकडेवारीमधून निदर्शनास येते की, २५ ते ३० वयोगटातील गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष २०२४ ते २०२६ दरम्यान ८६ टक्‍क्‍यांनी वाढून १,२३४ वरून २,२९० वर पोहोचली आहे. कोटकच्या वैयक्तिक गृहकर्ज ग्राहकांमध्ये जेन झेडचा वाटा दोन वर्षांत ६ टक्‍क्‍यांवरून ९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे, म्हणजेच त्यांच्या सहभागात ५० टक्‍के वाढ झाली आहे.

यामुळे ते बँकेच्या होम लोन बुकमधील सर्वात वेगाने वाढणारा तरुण ग्राहक वर्ग ठरले आहेत. याउलट, याच कालावधीत ३० ते ४५ वयोगटातील गृहकर्जदारांच्या संख्येत २६ टक्‍के वाढ नोंदवली गेली. या ट्रेंडमधून निदर्शनास येते की, भारतातील तरुणांचा घरमालक होण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पूर्वीच्या पिढ्या ज्या टप्प्यावर आयुष्यात उशिरा पोहोचत होत्या, तो टप्पा आता खूप लवकर गाठला जात आहे. GenZ

अनेक वर्षांपासून अंदाज लावला जात होता की, GenZ दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहील, मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या घेणे टाळेल आणि स्थिरतेपेक्षा लवचिकतेला प्राधान्य देईल. पण आकडेवारीवरून स्पष्ट होते की, घराचा विचार येतो तेव्हा भारतातील अनेक तरुण अपेक्षेपेक्षा खूप आधीच दीर्घकालीन निर्णय घेत आहेत. “भारतातील कुटुंबांमध्ये स्वतःचे घर असण्याला आजही विशेष स्थान आहे,” असे कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्ज विभागाचे प्रमुख नकुल सक्सेना म्हणाले. “लोकांचा घर घेण्याचा निर्णय आता वय बदलत आहे. पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वासाने तरुण कर्जदार बाजारपेठेत उतरताना दिसत आहेत.”

आई-वडिलांपेक्षा लवकर घर

अनेक कुटुंबांमध्ये, ज्या वयात त्यांचे आई-वडील घरासाठी बचत करत होते, त्याच वयात आजचे तरुण प्रोफेशनल्‍स घरे खरेदी करत आहेत. काही केसेसमध्ये, मुले त्यांच्या स्वतःच्या कमाईतून आई-वडिलांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहेत. तर इतर केसेसमध्ये, पती-पत्नी दोघांचीही मिळकत असल्याने पूर्वीच्या पिढ्यांनी वर्षानुवर्षे लांबणीवर टाकलेले निर्णय आता वेगाने घेतले जात आहेत.

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

कोरोनाने विचार बदलले

कोरोना महामारीने घराच्या प्राधान्यक्रमांना नव्याने आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसते. घरात घालवलेल्या दीर्घ कालावधीमुळे अनेक तरुण कुटुंबांनी पुरेशी जागा, गोपनीयता, नैसर्गिक प्रकाश, बांधकामाचा दर्जा आणि कम्युनिटी लिव्हिंग यांना अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली.

घर हे आता केवळ राहण्याचे ठिकाण न राहता जगणे, काम करणे आणि भविष्य घडवण्याचे ठिकाण बनले आहे. हा बदल मानसिकतेतील व्यापक परिवर्तनाला देखील सादर करतो. सर्व गोष्टी जुळून येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा अनेक तरुण खरेदीदार त्यांच्या आकांक्षा लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याचा पर्याय निवडत आहेत. पूर्वीच्या पिढ्यांसाठी, करिअर आणि आर्थिक आघाडीवर अनेक वर्षांच्या प्रगतीनंतर घर घेणे शक्य होत असे. आज भारतातील

पहिलं घर म्हणजे पहिली पायरी

अनेक तरुणांच्या मते, घर हे केवळ आर्थिक स्थिरता आल्यावरच खरेदी केले जात नाही, तर आयुष्यात स्थिरता निर्माण करण्यास मदत करणारे साधन आहे.तसेच उच्च शिक्षण, करिअरमधील जलद प्रगती आणि उत्पन्नातील वाढ यामुळे भारतातील अनेक तरुणांना आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप लवकर स्वतःचे घर घेण्याचा टप्पा गाठण्यास मदत होत आहे.

“आम्हाला यामध्ये अधिक ठाम निश्चय दिसून येतोय. पूर्णपणे स्थिरावण्याची वर्षानुवर्षे वाट पाहत बसण्यापेक्षा तरुण खरेदीदार आयुष्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा आत्मविश्वास दाखवत आहेत,” असे सक्सेना म्हणाले. “कोटकमध्ये आम्हाला त्यांच्या या प्रवासात पाठबळ देऊन त्यांचा निश्चय प्रत्यक्षात आणण्यास मदत करताना अभिमान वाटतो.” हा बदल तरुण खरेदीदारांच्या गृहखरेदीच्या पद्धतीलाही नव्याने आकार देत आहे. एकाच वेळी मोठे आणि कायमस्वरूपी घर घेण्याची वाट बघत बसण्यापेक्षा, अनेकजण आपल्या सध्याच्या बजेट आणि जीवनशैलीला अनुरूप अशी घरे खरेदी करत आहेत. ते पहिल्या घराकडे भविष्यातील आर्थिक प्रगतीची पहिली पायरी म्हणून पाहत आहेत.

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचा नवा नियम! ‘या’ सेवेसाठी …

कोटकच्या मते, तरुण कर्जदारांच्या संख्येत झालेली ही वाढ भारतातील गृहनिर्माण बाजारपेठेमधील मोठ्या परिवर्तनाला निदर्शनास आणते. जेन झेडच्या वाढत्या समूहासाठी, हा त्यांनी घेतलेला पहिला प्रमुख आर्थिक निर्णय ठरत आहे. स्वतःचे घर असणे ही आजही मनापासून जपलेली मोठी आकांक्षा असली, तरी तरुण खरेदीदार आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करत आहेत. योग्य वेळेची किंवा परिपूर्ण क्षणाची वाट पाहत बसण्यापेक्षा अनेक जण लवकरात लवकर स्वत:चे घर खरेदी करण्याला पुढाकार देणे पसंत करत आहेत.

ते स्थिरता निर्माण करण्याचा, दीर्घकालीन संपत्ती उभारण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा एक मार्ग म्हणून घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. ज्या पिढीचा संबंध सहसा लवचिकता आणि सततच्या बदलांशी जोडला जातो, त्यांच्यासाठी स्वतःचे घर असणे हे सुरुवातीच्या काळातील स्थिरतेचे प्रतीक म्हणून पुढे येत आहे आणि विशेष म्हणजे, हा टप्पा अपेक्षेपेक्षा खूप आधी गाठला जात आहे.

Web Title: Gen z homebuyers india home loan borrowers rise 86 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • bank notes
  • Business News
  • Home loan

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
1

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
2

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट
3

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
4

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.