
GenZ Travel Trends: Gen Z मुळे 2025 मध्ये प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल
GenZ Travel Trends: क्लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आणि भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आज २०२५ मध्ये भारतीयांनी सुट्टीदरम्यान विमानाने केलेला प्रवास, मुक्काम आणि सुट्टीच्या नियोजनाचे पुनरावलोकन ‘क्लीअरट्रिप अनपॅक’ जारी केले. या वर्षाची खासियत म्हणजे Gen Z पर्यटकांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आणि ‘मूल्य व किफायतशीरपणा’ अग्रणी ऑफरिंग ठरली, जिने लाखो भारतीयांचे लक्ष वेधून घेतले.
उत्तर प्रदेश सर्वाधिक भेट देण्यात आलेले राज्य ठरले. निवासस्थानासाठी प्रयागराज आणि बरेली यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. व्हिएतनाम उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले. तर सोलो ट्रॅव्हलसाठी दिल्ली व बेंगळुरू अव्वल गंतव्ये ठरली. सोईस्कर UPI पेमेंट्स आणि अनेक बँकांसोबत सहयोगांमुळे यूपीआय व्यवहारांमध्ये ६ टक्के वाढ झाली आणि क्रेडिट कार्ड पेमेंट्समध्ये ८ टक्के वाढ झाली. क्लीअरट्रिपवर ६५ टक्क्यांहून अधिक बुकिंग्ज बजेट व मध्यम रेंजच्या हॉटेल्सच्या व्यापक श्रेणीसाठी करण्यात आले. २०२५ मध्ये Gen Z पर्यटकांमध्ये ६५ टक्के वाढ झाली. त्यांनी या वर्षी विविध पर्यटन स्थळांवर जाण्याचा आनंद घेतला. सर्वाधिक ‘पसंती’ दुबई, क्वॉलालंपूर व बँकॉक #GenZApproved मिळाली.
व्हिएतनाम २०२५ मधील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ ठरले, जेथे पर्यटक संख्येमध्ये १३३ टक्के वाढ झाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्यामागील आत्मविश्वासासाठी प्रमुख कारण क्लीअरट्रिपचे व्हिसा रिजेक्शन कव्हर होते.
वाराणसी आणि अंदमान बेटावर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सरासरी २० टक्के वाढ झाली. दिल्लीमधून हिमाचल प्रदेश, जयपूर आणि आग्रा येथे सर्वाधिक ये-जा प्रवास दिसण्यात आली. बेंगळुरूमधून कूर्ग, उटी आणि कोडाइकनालसाठी प्रवास करण्यात आला. पर्यटकांनी कामापेक्षा शांतमय विरंगुळ्याला प्राधान्य दिले, जेथे त्यांनी ऋषीकेश, कूर्ग आणि अल्लेपी येथे ‘कॅल्मकेशन’चा आनंद घेतला. स्पिटी, अंदमान व लडाख ही ‘डिजिटल डिटॉक्स’साठी सर्वाधिक पसंतीची गंतव्ये ठरली.
संपूर्ण भारतातील ‘अॅडव्हेंचर जंकीज’नी यंदा बिर बिलिंग, लक्षद्वीप आणि ऑली येथे साहसी पर्यटनाचा आनंद घेतला.
काही पर्यटकांनी कर्नाटकमध्ये निवासस्थानासाठी ३६१ दिवस आधी बुकिंग केले. काही पर्यटकंनी रिबंदर, गोव्यामध्ये निवाासस्थानासाठी ३५० दिवस आधी बुकिंग केले. ३ लाख व्यक्तींनी रात्री ३ ते सकाळी ४ दरम्यान तिकिटे बुक केली. या व्यक्तींनी जगातील सर्वाते मोठे व्यावसायिक विमान ३५३ एअरबस-३८० मधून प्रवास केला. क्लीअरट्रिपवर बुक करण्यात आलेल्या सर्वात स्वस्त फ्लाइटचा खर्च ० रूपये होता (ऑफर्स व वॉलेट क्रेडिट्सच्या माध्यमातून पूर्णपणे रिडिम करण्यात आले). सर्वात स्वस्त निवास ४८ रूपये होते. या व्यक्ती आता केस स्टडीज करत आहेत.
एका पर्यटकाने दिल्ली-गुवाहाटी फ्लाइटवर अडीच लाख रूपये खर्च केले, तर आणखी एका पर्यटकाने पॅरिस-मुंबई फ्लाइटवर साडे चार लाख रूपये खर्च केले. यंदा बुक करण्यात आलेला सर्वात महाग हॉटेल मुक्काम मालदिवमध्ये ४.४१ लाख रूपये होता. आम्हाला वाटते की, कदाचित हा खर्च विसरलेल्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी असेल. यामधून भारतातील लोकांमधील अचानक किंवा ऐनवेळी प्रवास करण्याची वाढती सवय दिसून येते.