
Gen Z मध्ये वाढत चाललेले 'रेज बुकिंग' नक्की आहे तरी काय? एका क्लिकवर घेतात बर्नआऊटपासून सुट्टी
ट्रेंड चांगलाच वाढला
कल्पना करा की तुम्ही ऑफिसमध्ये बसला आहात आणि दुसऱ्या बाजूने क्लाइंटचा कॉल सुरू आहे. तुमच्यावर डेडलाईनचे प्रेशर आहे. त्यात तुमचा बाँस यावरून सारखं चिक-चिक करत आहे. अशावेळी राग आलेले तुम्ही थेट तुमचा फोन उचलता आणि थेट एखाद्या हिल स्टेशन किंवा नयनरम्य बीचच्या ठिकाणाचे तिकीट बुक करता. तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही असे करणारे एकटे नाहीत. सध्याच्या घडीला या रेज बुकिंगचा ट्रेंड चांगलाच बादला आहे.
रेज बुकिंग म्हणजे काय ?
रेज बुकिंग ही अशीच हवेतून आलेली संकल्पना नाहीये. एका सर्वेमध्ये याबाबत धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेतील फेय ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल विमा प्लॅटफॉर्मने या रेज बुकिंग शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या एका सर्व्हेनुसार प्रत्येक तीन व्यक्तीमधील एक व्यक्ती कामाच्या ठिकाणचा तणाव किंवा वर्कप्लेस बर्नआऊटपासून सुटका पाहिजे म्हणून अचानक सुट्टीचं प्लॅनिंग करत आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रेज बुकिंगचा अर्थ हा ऑफिसच्या तणावाला कंटाळून अचानक ट्रिप प्लॅन करणे. आजच्या घडीला २४ ते ४५ वर्षाचे तरूण व्हेकेशनला जाण्याकडे फक्त एक छंद म्हणून पाहत नाहीत तर रिफ्रेश होण्याचे आणि मानसिक स्थिती पुन्हा चांगली करण्यासाठीचा मार्ग म्हणून याच्याकडे पाहत आहे. ते हा प्रवास मजा म्हणून नाही तर शांततेच्या शोधात करतात.
आकडे काय सांगतात ?