Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Accessible Future: गोदरेज इंडस्ट्रीजकडून ‘असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स 2025’ दिव्यांग रोजगार व सुलभ तंत्रज्ञानासाठी पुढाकार

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आपल्या पहिल्या असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स 2025 चे आयोजन केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने कामाच्या ठिकाणी सुलभता आणि समावेशन कसे वाढवता येईल याची पुनर्कल्पना करण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती

  • By Priti Hingane
Updated On: Dec 03, 2025 | 09:24 AM
गोदरेज इंडस्ट्रीजकडून ‘असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स 2025’ दिव्यांग रोजगार व सुलभ तंत्रज्ञानासाठी पुढाकार

गोदरेज इंडस्ट्रीजकडून ‘असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स 2025’ दिव्यांग रोजगार व सुलभ तंत्रज्ञानासाठी पुढाकार

Follow Us
Close
Follow Us:
  • गोदरेज ग्रुपतर्फे ‘असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स’चे आयोजन
  • दिव्यांग रोजगार व सुलभ तंत्रज्ञानासाठी पुढाकार
  • AI-आधारित सुलभतेकडे गोदरेजची वाटचाल
 

India’s Accessible Future: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आपल्या पहिल्या असिस्टिव्ह टेक कॉन्फरन्स 2025 चे आयोजन केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने कामाच्या ठिकाणी सुलभता आणि समावेशन कसे वाढवता येईल याची पुनर्कल्पना करण्यासाठी नवनिर्माते, कंपन्या, संशोधक, दिव्यांग-अधिकार क्षेत्रातील नेते आणि खेळाडू एकत्र आले होते. आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन साजरा करत ही परिषद भारतातील सर्वांसाठी समान संधी असलेले कार्यस्थळ घडवण्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी एक सहकार्यात्मक मंच ठरली.

गोदरेज DEI लॅबचे प्रमुख आणि क्वेरीस्तान या पुस्तकाचे लेखक पर्मेश शाहानी म्हणाले, “ही परिषद एका साध्या सोप्या सत्याला पुन्हा पुष्टी देत आहे, जेव्हा आपण संवेदनशीलतेने डिझाइन करतो, हेतुपूर्णरीत्या सहकार्य करतो आणि समानतेच्या बांधिलकीने नाविन्यपूर्णता आणतो तेव्हा आपण जिथे प्रत्येकजण प्रगती करू शकतो अशी एक दुनिया घडवतो. ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी ही तंत्रसाधनांची मालिका असण्यापलीकडे स्वावलंबन, सन्मान आणि संधीचा मार्ग आहे. आज आम्ही जे सादर केले ती तर फक्त सुरुवात आहे. भारतातील सुलभ कार्यपद्धतीचे भविष्य खुलेपणा, कल्पनाशक्ती आणि आपण गृहित धरतो त्या प्रणालींचा धाडसाने पुनर्विचार करण्यावर अवलंबून आहे.”

हेही वाचा : NMC News: ‘स्वच्छ गोदावरी ग्रीन बॉण्ड्स २०३०’ उपक्रमाला NSE वर भव्य प्रतिसाद! इश्यू झाला ओव्हरसबस्क्राईब

या परिषदेत समावेशक तंत्रज्ञान क्षेत्रातील 12 स्टार्ट-अप्स सहभागी झाले. काहींनी दिवसभर चाललेल्या प्रदर्शनात Access for All, NCPEDP आणि AssisTech Foundation यांसारख्या संस्थांचे वैशिष्ट्यपूर्ण ॲसिस्टिव्ह तंत्रज्ञान सादर केले. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांनी ThisAbleMe Echo हे त्यांचे स्वतःचे अ‍ॅप सादर केले. हे प्रारंभी कर्मचाऱ्यांसाठी इन-हाउस उपलब्ध असेल. ThisAbleMe Echo हे सांकेतिक भाषेतून संवाद साधण्यास आणि संभाषणांचे सारांश देण्यास सक्षम साधन आहे.

याचबरोबर, गोदरेज च्या आयटी टीम, गोदरेज AI Lab, गोदरेज गुड अँड ग्रीन यांनी AI-सक्षम संवाद साधने, सर्वसमावेशक डिजिटल इंटरफेसेस आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्श-अनुभवाधारित शिक्षणसाहित्य अशा इन-हाउस नवकल्पना सादर केल्या. यानंतर गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि Atypical Advantage यांच्या वतीने कंपन्यांना त्यांचे कार्य अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी मदत करेल अशा EmployAbility Toolkit चे अनावरण करण्यात आले. दुपारच्या EmployAbility in Manufacturing Summit मध्ये उत्पादन आणि FMCG क्षेत्रातील अग्रणींनी सर्वसमावेशक पायाभूत सुविधा, कौशल्यविकासाच्या नवीन दिशा आणि प्रगत नेतृत्वाद्वारे कारखाने अधिक सुलभ आणि संधीसमृद्ध जागांमध्ये कसे बदलत आहेत यावर विचारमंथन केले.

हेही वाचा : Mutual Fund News: SEBI चा मोठा निर्णय! आता म्युच्युअल फंड युनिट्स ‘करमुक्त’ गिफ्ट करता येणार

दिवसाचा समारोप ‘India’s Accessible Futures’ या चर्चासत्राने झाला. गोदरेज कॅपिटल आणि गोदरेज DEI Lab यांनी तो आयोजित केला होता. यात न्यूरोक्विअर मानववंशशास्त्रज्ञ पारस अरोरा, पॅरा-बॅडमिंटन विजेती मानसी जोशी, NCPEDP चे संचालक अरमान अली, AssisTech Foundation च्या चाहत दुबे आणि IIM Bangalore येथील प्राध्यापक मुक्ता कुलकर्णी सहभागी झाले. चर्चेत ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी, डिझाईन थिंकिंग आणि वापरकर्त्यांद्वारे चालवली जाणारी नवकल्पना यामुळे सुलभतेची व्याख्या कशी बदलत आहे आणि कार्यशक्तीतील सहभाग कसा वाढतो आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. देशभरात ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजीचे मुख्य प्रवाहात रूपांतर करण्यासाठी अधिक परवडणाऱ्या वाजवी किंमतीत सहकार्य आणि धोरणात्मक पाठबळाचीही गरज अधोरेखित करण्यात आली

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात सुलभता, नाविन्यपूर्णता, उत्पादकता आणि वाढ यांच्याशी अविभाज्य नाते असलेली अधिक सर्वसमावेशक कार्यशक्ती उभी करण्यासाठी कटिबद्ध आहे

Web Title: Godrej industries assistive tech conference 2025 initiative for disabled employment and accessible technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Godrej Industries

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.