Gold-Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 10 ग्रॅमचा दर लवकरच होणार 55 हजार? तज्ज्ञांनी केला दावा
5 एप्रिल रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,163 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,399 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,872 रुपये आहे. काल 4 एप्रिल रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,339 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,561 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,005 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 68,720 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत चढउतार सुरु आहे. गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किंमती कमी होत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागत आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण सोन्याच्या किंमती कमी होण्याची वाट पाहत असतो. कारण गगनाला भिडलेल्या किंमतीत सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशाच लोकांसाठी ही आजची बातमी आहे.
तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होणार आहे. ही घसरण एक दोन हजारांची नाही तर तब्बल 40 टक्क्यांची असणार आहे. म्हणजेच सामान्य माणसांनी कधी विचार देखील केला नसेल, एवढी मोठी घसरण आता सोन्याच्या किंमतीत होणार आहे.
तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमतीत 40 टक्क्यांनी घसरण होणार आहे. म्हणजेच सोन्याचा भाव 55 हजार रुपये होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय बाजारात सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमती 90 हजार रुपयांच्या घरात आहे. येत्या काही दिवसांत हीच किंंमत 55 हजार रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आता याच वाढलेल्या किंमती पुन्हा कमी होणार आहेत.
अमेरिकी विश्लेषक फर्म मॉर्निंगस्टार यांनी दावा केला आहे की, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमती प्रचंड कमी होणार आहेत. सोन्याच्या किंमती 38 टक्क्यांहून अधिक कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या भारतीय बाजारात सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमती 90 हजार रुपयांच्या घरात आहे. येत्या काळात या किंमती 10 ग्रॅमची किंमती 55,000 रुपये होण्याची शक्यता आहे.
आर्थिक अनिश्चितता, महागाई आणि भू-राजनीतिक तणाव यामुळे सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळतो. अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळादरम्यान झालेल्या व्यापार युद्धाचा परिणाम देखील सोन्याच्या किंमतीवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याचा वाढता पुरवठा आणि कमी होत असलेली मागणी या कारणामुळे किंमतीत घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.