क्रेडिट कार्डपासून आधार डिटेल्सपर्यंत चोरीला जाऊ शकते तुमची सर्व माहिती; आत्ताच डिलीट करा स्मार्टफोनमधील धोकादायक Apps
आजच्या डिजीटल युगात आपली सर्व कामं स्मार्टफोनद्वारे केली जातात. आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक नवीन अॅप्स देखील डाऊनलोड करतो. हे स्मार्टफोन अॅप्स आपल्याला आपल्या अनेक कामांसाठी फायदेशीर ठरतात. जसं की ऑनलाईन व्यवहार किंवा चॅटिंग आणि कॉलिंग. प्ले स्टोअरवर डेव्हलपर्सनी तयार केलेले लाखो अॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही अॅप्स त्यांच्या युजर्सनी फ्री सर्विस देतात, तर काही अॅप्स प्रिमियम मेंमबर्ससाठी तयार केले जातात.
स्मार्टफोन अॅप्स म्हटलं तर केवळ फ्री आणि प्रिमियम एवढचं नसतं. तर हे अॅप्स खरे आहेत की फ्रॉड, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये एखादा अॅप डाऊनलोड केला आणि तो अॅप फ्रॉड असेल तर आपली संपूर्ण माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते आणि आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे असे अॅप्स आपल्या स्मार्टफोनमधून डिलीट करणं फार गरजेचं आहे. पण आपल्या स्मार्टफोननधील फ्रॉड अॅप्स ओळखाचे कसे, हा प्रश्न आलाच. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील फ्रॉड अॅप्स ओळखू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
बनावट आणि फ्रॉड अॅप्स लोकांना बक्षिसे ऑफर करतात, या बक्षीसांसाठी ते लोकांना क्रेडिट कार्डची माहिती नोंद करण्यास भाग पाडतात. हे मालवेअर तुमचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरण्यासाठी डिझाइन केलेले असतात. बनावट अॅप्स मूळ प्लॅटफॉर्मची कॉपी करतात. नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिट (NCTAU) च्या अलीकडील अहवालांमधून असे दिसून आले आहे की हे अॅप्स कॉल इंटरसेप्ट करू शकतात, एसएमएस डेटा अॅक्सेस करू शकतात आणि पॅन नंबर, आधार तपशील आणि बँकिंग क्रेडेन्शियल्स यासारखी वैयक्तिक माहिती चोरू शकतात. त्यामुळे असे अॅप्स स्मार्टफोनमधून डिलीट करणं गरजेच आहे.
केवळ 6 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Redmi A5; 5200mAh बॅटरीसह मिळणार हे स्पेशल फीचर्स