भारत-पाक तणाव अन् अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, सोन्याच्या दरांवर होणार परिणाम
Gold Rate Today News in Marathi: आज देशात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे. याच दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जर सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचं झाले तर, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पहिल्यांदाच सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पुढे गेला, परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे अचानक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या सोन्याचे नवे दर…
बुधवार, ३० एप्रिल रोजी, एमसीएक्सच्या किमतीत सुमारे ०.५ टक्क्यांची घसरण दिसून आली. तर चांदीच्या किमतीत सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली आहे. पण आज भारतात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे, अशा परिस्थितीत लोकांसाठी सोने खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी असू शकते.
या अक्षय्य तृतीयेला एमसीएक्स सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. अधिकृत वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, ३० एप्रिल रोजी सकाळी १०:३८ वाजताच्या सुमारास, सोन्याचा भाव ९५२७० रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो ३२२ रुपयांनी किंवा ०.३४ टक्क्यांनी कमी झाला. आज, एमसीएक्सवर, ५ जून रोजी सोन्याचा करार ९५३५३ रुपये प्रति किलोवर उघडला, जो त्याच्या मागील बंद किमती ९५५९२ रुपये प्रति १० ग्रॅमपेक्षा कमी आहे.
दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹८७,५१४ आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹९५,४७० आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,६६१ रुपये आहे आणि २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,६३० रुपये आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,९१८ रुपये आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९५,९१० रुपये आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,५४२ रुपये आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९५,५०० रुपये आहे. नोएडामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,५६० रुपये आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९५,५२० रुपये आहे.