
सणासुदीत सोने झाले स्वस्त! ( सौजन्य - सोशल मीडिया )
आज सराफा बाजारात सोन्याचा भाव ५०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,५५,४०० रुपये झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात झालेली विक्री हे या घसरणीचे कारण आहे. काल, १४ सप्टेंबर रोजी, हेच ९९.९ टक्के शुद्ध सोने प्रति १० ग्रॅम १,५५,९०० रुपयांवर बंद झाले होते.
चांदीचा भाव पाहता, आज देशभरात चांदीचा भाव प्रति किलोग्राम ₹२३४,६०० वर स्थिर आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्वसामान्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे, कारण बहुतेक लोक दिवाळीसाठी चांदीची नाणी, दागिने आणि भांडी खरेदी करतात.
जागतिक स्तरावर, स्पॉट सोन्याचा भाव $५७.२२ ने, म्हणजेच १.३ टक्क्यांनी घसरून प्रति औंस $४,२९१.७१ वर आला, आणि चांदीच्या किमती जवळपास तीन टक्क्यांनी घसरून $६२.८२ वर आल्या. वास्तविक पाहता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढली आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर मोठा दणाव निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. ज्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीवर आणखी दबाव येत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सोने – चांदीचे दर फार कडाडत आहे. भारतामध्येही आजच्या दिवसांत सोन्याच्या दरात जरी घसरण दिसत असली तरीही मात्र सोन्याची दर मागील काही काळात बरेच वाढले आहेत.