Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Share Price Jumps: निकालांचा धमाका अन् शेअरचा ठसका! रिलायन्सची बाजारात ८ टक्क्यांची भरारी

Reliance Share Price Jumps: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आर्थिक वर्ष 2026-27 मधील दुसऱ्या तिमाहीच्या विक्रमी निकालांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी जवळपास 8% पर्यंत तेजी पाहायला मिळाली. रिलायन्सचा निव्वळ नफा 34% वाढून 29,550 कोटी रुपये, तर एकूण कमाई 28% वाढून 3.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 11:50 AM
Reliance Share Price Jumps: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Reliance Share Price Jumps: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्सच्या शेअरमध्ये 8% पर्यंत तेजी
  • Q2 मध्ये 29,550 कोटींचा विक्रमी नफा
  • सेन्सेक्सला रिलायन्सच्या तेजीचा मोठा आधार

 

सोमवारचा दिवस रिलायन्ससाठी आणि शेअर मार्केटसाठी एकदम खास ठरला. सकाळी मार्केट उघडताच रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर रॉकेटसारखा वर गेला. जवळपास 8% वाढ झाली. हा शेअर आज निफ्टी 50 मधला सगळ्यात जास्त वाढणारा शेअर ठरला आणि सगळ्यात जास्त ट्रेडिंग पण याच शेअरमध्ये झाली, NSE आणि BSE दोन्हीकडे. Reliance Share Price Jumps:

सकाळी 10 वाजता रिलायन्स 7.5% वाढीसह 1,252 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीचं मार्केट कॅप आता 16.94 लाख कोटींवर गेलंय. विचार करा, किती मोठा आकडा आहे.

रिलायन्सच्या जोरावर अख्खं मार्केट वर

रिलायन्स एकटा वाढला नाही, त्याने अख्ख्या मार्केटला वर खेचलं. सकाळी 10.45 वाजता सेन्सेक्स 1,050 अंकांनी वाढून 75,509 वर गेला, म्हणजे 1.4% वाढ. निफ्टी पण 290 अंकांनी वाढून 23,343 वर पोहोचला. आजची तेजी ही फक्त रिलायन्समुळेच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

काय झालं?

Q2 चा रिझल्ट आला आणि सगळे थक्क झालेया वाढीमागचं खरं कारण आहे कंपनीचा तिमाही निकाल. जुलै-सप्टेंबर म्हणजे Q2 FY27 मध्ये रिलायन्सने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा नफा कमावलाय. कमाई, नफा, सगळंच रेकॉर्डब्रेक.कंपनीची एकूण कमाई 28% वाढून 3.62 लाख कोटी झाली, जी आजपर्यंतची सर्वात जास्त आहे. EBITDA 24% वाढून 62,409 कोटी झाला. आणि निव्वळ नफा 34% वाढून 29,550 कोटींवर गेला. म्हणजे एका तिमाहीत जवळपास 30 हजार कोटींचा नफा.

Share Market Update: जागतिक बाजारात घसरणीचा हाहाकार, सेन्सेक्सची मात्र 1000 अंकांची भरारी

हे कसं झालं?

सगळ्यात मोठा हात हा ऑईल-टू-केमिकल म्हणजे O2C बिझनेसचा. या बिझनेसने तर कमालच केली. कमाई 44.2% वाढून 2.32 लाख कोटी झाली आणि EBITDA 67.9% वाढून 25,203 कोटी झाला. पेट्रोल, डिझेल बनवण्यावरचा नफा म्हणजे क्रॅक गेल्या वर्षीपेक्षा 3 ते 3.7 पट वाढला आहे, तो ऐतिहासिक उच्चांकावर आहे.

दुसरीकडे जिओचा पण धंदा जोरात आहे. जिओ प्लॅटफॉर्मची कमाई 11.3% वाढून 47,485 कोटी झाली. EBITDA 16.6% वाढून 21,879 कोटी झाला. नवीन ग्राहक जोडले गेले, दरडोई उत्पन्न वाढलं आणि डिजिटल सर्व्हिस वाढली त्याचा फायदा झाला.

ब्रोकरेज पण खुश, म्हणाले अजून वाढणार

रिझल्ट इतका भारी आल्यावर मोठ्या ब्रोकरेज कंपन्या पण खुश झाल्या आहेत. गोल्डमन सॅक्स आणि नोमुराने लगेच BUY रेटिंग दिलंय.गोल्डमन सॅक्सने टार्गेट प्राईस 1,840 रुपये दिलाय. शुक्रवारी 1,164 वर बंद झालेल्या शेअरपासून अजून 58% वाढ होऊ शकते. त्यांनी सांगितलं की कंपनीचा EBITDA त्यांच्या अंदाजापेक्षा 9% जास्त आहे, सगळं O2C मुळे.नोमुराने टार्गेट 1,560 रुपये ठेवलाय. त्यांनी पण सांगितलं की रिफायनिंगचा नफा अनेक दशकातला सर्वात जास्त आहे. कंपनीचा एकूण EBITDA सलग 19% वाढलाय.

Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष

पण दोघांनी एक गोष्ट सांगितली, डिसेंबरच्या तिमाहीत रिफायनिंगचा नफा थोडा कमी होऊ शकतो कारण कच्चं तेल आणायचा खर्च म्हणजे VLCC भाडं वाढलंय. आणि रिटेलचा बिझनेस थोडा कमकुवत आहे कारण सणासुदीची खरेदी पुढे ढकलली गेली आणि डिजिटलवर खर्च वाढलाय. पण तरीही टेलिकॉम आणि ऑईल बिझनेसच्या जोरावर रिलायन्स अजून जोरात पळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये किती वाढ झाली?

    Ans: सोमवारी रिलायन्सच्या शेअरमध्ये जवळपास 8% पर्यंत वाढ झाली.

  • Que: रिलायन्सची दुसऱ्या तिमाहीतील एकूण कमाई किती होती?

    Ans: कंपनीची एकूण कमाई 28% वाढून 3.62 लाख कोटी रुपये झाली.

  • Que: रिलायन्सच्या शेअरमधील तेजीचा सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय परिणाम झाला?

    Ans: सेन्सेक्स 1,050 अंकांनी वाढून 75,509 वर, तर निफ्टी 290 अंकांनी वाढून 23,343 वर पोहोचला.

Web Title: Reliance share price jumps 8 percent record q2 results sensex rally rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Business News
  • Reliance
  • Reliance Industries
  • Reliance Jio

संबंधित बातम्या

Crypto Hack: जगातील सर्वात मोठी क्रिप्टो चोरी Binanceवर; हॅकर्सनी 20 मिनिटांत 6.36 अब्ज डॉलर्स चोरले, उत्तर कोरियावर संशय
1

Crypto Hack: जगातील सर्वात मोठी क्रिप्टो चोरी Binanceवर; हॅकर्सनी 20 मिनिटांत 6.36 अब्ज डॉलर्स चोरले, उत्तर कोरियावर संशय

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती
2

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

Imagimake Exports Grow : मुंबईच्या इमॅजिमेकची जागतिक बाजारात भरारी! निर्यात 10 पटीने वाढली; Amazon Global Selling टर्निंग पॉईट
3

Imagimake Exports Grow : मुंबईच्या इमॅजिमेकची जागतिक बाजारात भरारी! निर्यात 10 पटीने वाढली; Amazon Global Selling टर्निंग पॉईट

Cityscape India चे भारतात पदार्पण; मुंबईत रंगणार रिअल इस्टेटचा ग्लोबल इव्हेंट, ४० हून अधिक डेव्हलपर्स येणार एकत्र
4

Cityscape India चे भारतात पदार्पण; मुंबईत रंगणार रिअल इस्टेटचा ग्लोबल इव्हेंट, ४० हून अधिक डेव्हलपर्स येणार एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.