
भारताच्या वाढीला चालना देणाऱ्या 'या' कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी
Investment Focus: मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने मिरे अॅसेट बीएसई ५०० डिव्हिडंड लीडर्स फिफ्टी ईटीएफ या बीएसई ५०० डिव्हिडंड लीडर्स फिफ्टी टोटल रिटर्न इंडेक्सचा माग ठेवणाऱ्या/पुनरावृत्ती करणाऱ्या खुल्या (ओपन एण्डेड) योजनेची घोषणा केली. तसेच मिरे अॅसेट निफ्टी टॉप २० इक्वल वेट ईटीएफ या निफ्टी टॉप २० इक्वल वेट टोटल रिटर्न इंडेक्सची पुनरावृत्ती करणाऱ्या योजनेची घोषणा केली. दोन्ही योजना दीर्घकालीन वाढ व स्थिर उत्पन्न देण्यावर लक्ष केंद्रीत करतील. यामध्ये पहिल्या ईटीएफचे उद्दिष्ट तुलनेने उच्च व सातत्यपूर्ण लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा माग ठेवणे हे आहे, तर दुसरा ईटीएफ भारताच्या वाढीला चालना देण्याचे उद्दिष्ट असलेल्या २० सर्वांत मोठ्या कंपन्यांना समान महत्त्व देणारा आहे
दोन्ही फंड ०२ डिसेंबर २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुले झाले आहेत. मिरे अॅसेट बीएसई ५०० डिव्हिडंड लीडर्स ५० ईटीएफ हा लाभांश देण्याबाबत दीर्घकाळापासून सातत्य दाखवणाऱ्या, भक्कम ताळेबंद तसेच पैशाचा निकोप ओघ असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे. व्यवसायाचा दर्जा व स्थिती स्थापकत्व पुन्हा-पुन्हा दाखवून देणाऱ्या कंपन्यांचा यात समावेश होतो. तर मिरे अॅसेट निफ्टी टॉप २० इक्वल वेट ईटीएफ निफ्टी ५० इंडेक्समधील आघाडीच्या २० कंपन्यांमध्ये समान गुंतवणूक करतो, या भारतातील बाजारांच्या सुमारे निम्म्या भागावर वर्चस्व गाजवणाऱ्या कंपन्या आहेत, यांमध्ये दूरसंचार, बँकिंग, ऑटोमोटिव, पायाभूत सुविधा आदी अनेक विभागांतील कंपन्यांचा समावेश होतो.
हेही वाचा : RBI Repo Rate Update: RBI चा मोठा निर्णय! रेपो दर आता ५.२५%, शेअर बाजारात तेजी
या ईटीएफ्ससाठी एनएफओ डिसेंबर १०, २०२५ रोजी बंद होणार आहे. दोन्ही योजना डिसेंबर १६, २०२५ रोजी पुन्हा खुल्या होणार आहेत. लाभांश देण्यात आघाडीवर असलेल्या कंपन्यांमध्ये स्थैर्य आणि दीर्घकालीन संपदासंचय संभाव्यतेचे अनन्यसाधारण मिश्रण असते. या कंपन्यांना लाभांश देणे, उत्तम प्रशासन व आर्थिक शिस्त या निकषांवर सातत्य दाखवलेले आहे. मिरे अॅसेट बीएसई ५०० डिव्हिडंट लीडर्स ५० ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना उच्च दर्जाच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा दमदार, पारदर्शक आणि तुलनेने किफायतशीर मार्ग देऊ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे फंड व्यवस्थापक सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले.
मिरे अॅसेट बीएसई ५०० डिव्हिडंड लीडर्स फिफ्टी ईटीएफ
हा ईटीएफ बीएसई फाइव्ह ५०० डिव्हिडंड लीडर्स फिफ्टी इंडेक्सवर लक्ष ठेवणार आहे. हा इंडेक्स बीएसई ५०० मधील सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा माग ठेवतो. किमान ५ वर्षांपासून सूचीबद्ध (लिस्टेड) असलेल्या तसेच सातत्याने लाभांश देणाऱ्या (गेल्या १० वर्षांच्या काळात किंवा सूचीबद्ध झाल्यापासून किमान ८० टक्के वेळा) बीएसई ५०० मधील कंपन्यांमध्ये हा ईटीएफ गुंतवणूक करेल. उच्च लाभांश उत्पन्न आणि लाभांश वाढ समभाग यांसारख्या लाभांश धोरणांमुळे भांडवल अधिमूल्यन व लाभांशातून मिळणारे नियमित उत्पन्न या दोन्ही मार्फत परतावा मिळतो.
अशा प्रकारचे समभाग लाभांशामार्फत नियमित उत्पन्नाचा स्रोत पुरवतात, शिवाय समभागांच्या मूल्यात वाढ झाल्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळतेच. लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा ताळेबंद सहसा भक्कम असतात, निधीचा ओघ निकोप असतो आणि भांडवल वितरण शिस्तबद्ध असते. यातून व्यवसायाचा एकंदर दर्जा दिसून येतो. गुंतवणूकीसाठी बळकट पायाभूत मूल्ये असलेल्या कंपन्यांच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरते.
हेही वाचा : महिलांसाठी मोठी बातमी: ‘या’ योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज
मिरे अॅसेट निफ्टी टॉप २० इक्वल वेट ईटीएफ
हा ईटीएफ बाजारातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. भारतातील आघाडीच्या २० तसेच कदाचित सर्वांत प्रभावी सूचीबद्ध कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करेल. एकूण भांडवलापैकी ४६.५ टक्के भांडवल या कंपन्यांचे आहे आणि पायाभूत सुविधा, डिजिटल स्वीकृती, आर्थिक समावेशक व उत्पादनाचा आवाका यांत आघाडीवर राहून या कंपन्या भारताच्या वाढीला चालना देत आहेत.मोठ्या भांडवलाच्या (लार्ज-कॅप) कंपन्या बहुदा भक्कम आर्थिक पायावर उभ्या असतात आणि आपापल्या उद्योगक्षेत्रातील प्रस्थापित आघाडीच्या कंपन्या असतात.
उद्योगक्षेत्रातील छोट्या कंपन्यांच्या तुलनेत या कंपन्यांमध्ये ढोबळपणे चढउतार कमी प्रमाणात असल्याचा फायदा त्यांना होतो, बाजारांत तणावाची स्थिती निर्माण झाली तरीही या कंपन्यांच्या समभागांच्या किमती घसरण्याची शक्यताही तुलनेने कमी असते. वित्तीय सेवा, आयटी सेवा, उपभोग, वाहने व दूरसंचार आदी विभागांतील कंपन्यांचा समावेश एका पोर्टफोलिओमध्ये असल्यामुळे ईटीएफमध्ये वैविध्य उत्तम राहील. प्रत्येक कंपनीत समान गुंतवणूक केली जाणार असल्याने एकांगी गुंतवणूकीचा धोका टाळला जाईल.