कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा... किती रुपयांना मिळणार!
थंडीच्या हंगामात सर्वच घटकांना स्वस्त दरात कांद्याचा लाभ घेता येत नाही. कांद्याची नवीन आवक होऊनही भाजी मंडईत कांद्याची मुबलक आवक नसल्याने त्याचा भाव ५० रुपये तर काही ठिकाणी ६० रुपये किलोपर्यंत दिसतो आहे. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसामान्यांसाठी स्वस्त कांद्याची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली आहे. सरकारकडून ग्राहकांना 35 रुपये किलोने कांदा खरेदी करता येणार आहे.
ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ ३५ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. या उपक्रमांतर्गत, सध्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कांद्यासाठी भाजीपाला व्हॅन पुरवल्या जात आहेत आणि त्यांची ठिकाणे ग्राहकांना सांगितली जात आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये 35 रुपये प्रति किलो कांदा
उत्तर प्रदेशमधील वाराणसी, सोनभद्र, मिर्झापूर येथील अनेक ठिकाणी कांदा उपलब्ध करून दिला जात आहे. जो 35 रुपये किलो दराने उपलब्ध होईल. हे कांदे वाराणसीमध्ये २५ ठिकाणी उपलब्ध असतील, तर सोनभद्रमध्ये १४ ठिकाणी स्वस्त कांदा खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. मिर्झापूरमध्ये १५ ठिकाणी सरकारी व्हॅनमधून ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जात आहे.
बिहारमध्येही स्वस्त कांद्याची भेट
बिहारमध्येही 35 रुपये किलोचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी तीन शहरांमध्ये व्हॅनमधून कांदा विकला जात आहे. यामध्ये पटना, आराह आणि बक्सर या शहरांचा समावेश आहे. बक्सरमध्ये १२ ठिकाणी आणि आराहमध्ये ६ ठिकाणी स्वस्तात उपलब्ध आहे. ग्राहक व्हॅनद्वारे ३५ रुपये किलो दराने कांदा खरेदी करू शकतात. पाटण्यात 8 ठिकाणी स्वस्त कांदा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
कांद्याचे दर वाढतात त्यावेळीच सरकारचा हस्तक्षेप होतो
दरम्यान, एका बाजूला सरकारकडून कमी दराने कांद्याची विक्री होत असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी आमच्या कांद्याचे दर वाढतात. त्यावेळी सरकार हस्तक्षेप करते आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर कसा पडेल? यासाठी प्लॅन आखते असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पडत असतात, त्यावेळी मात्र, सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली आहे.