Rishabh Pant : २७ कोटींचा ऋषभ पंत, क्रिकेटच नाही तर गुंतवणूक करण्यातही आहे सर्वांत पुढे!
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या आयोजनामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तो यावर्षीच्या मेगा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दरम्यान, पंतसंदर्भातील एक बातमी पुन्हा चर्चेत आली आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज पंत याने ऑनलाइन सॉफ्टवेअर मार्केट प्लेस टेकजॉकीमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंत यांनी 7.40 कोटी रुपयांना कंपनीतील दोन टक्के हिस्सा खरेदी केल्याची माहिती कंपनीनेच दिली होती. कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये या डीलची माहिती दिली होती.
कंपनीचा अमेरिकेच्या बाजारपेठेतही प्रवेश
कंपनीच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, झोमॅटोचे उपाध्यक्ष आकाश नांगिया आणि त्यांचे महाविद्यालयीन मित्र, माजी मॅकिन्से कार्यकारी अर्जुन मित्तल यांनी 2017 मध्ये टेकजॉकीची सुरुवात केली. हे सॉफ्टवेअर विक्रेत्यांना भारतातील छोट्या व्यवसायांशी जोडते. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने अमेरिकेच्या बाजारपेठेतही प्रवेश केला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
ऋषभ पंतचा बिझनेस सेन्सही उत्तम
झोमॅटोचे उपाध्यक्ष नांगिया यांनी निवेदनात म्हटले आहे की, “इक्विटी 370 कोटी रुपयांच्या मुल्यांकनाने उभारण्यात आली आहे. पंतने कंपनीतील 2 टक्के भागभांडवल विकत घेतले आणि बोर्डात सामील होणे, जे त्यांच्यासाठी मोठे यश मिळवण्यासारखे आहे. क्रिकेटमधील खेळपट्टीवर त्यांची समजूत सर्वांनाच माहीत आहे, पण त्यांची व्यावसायिक जाणीव देखील प्रशंसनीय आहे.”
ऋषभ पंत आयपीएल 2025 मेगा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पंतला 27 कोटींना विकत घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सने आरटीएमचा प्रयत्न केला तरी लखनऊने रक्कम आणखी वाढवली आहे.
हे देखील वाचा – विधानसभा निकालाचा शेअर बाजारावर होणार परिणाम, वाचा… मार्केटमध्ये काय हालचाली होणार?
आयपीएलचा मेगा लिलाव
आयपीएलचा मेगा लिलाव आज होत आहे. ज्यामध्ये ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) 27 कोटी रुपयांना तर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएलचा लिलाव सुरू आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचा लिलाव परदेशात होत आहे. या लिलावात ५७४ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. या ५७७ खेळाडूंमध्ये ३६७ भारतीय आणि २१० परदेशी खेळाडू आहेत. ज्यात ४ सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. या लिलावात सर्व संघांना एकूण फक्त २०४ खेळाडूंवर बोली लावता येणार आहे, त्यापैकी जास्तीत जास्त ७० विदेशी खेळाडू असतील. भारतीय आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे.