गुंतवणूकदार मालामाल! एका वर्षात एक लाखाचे झाले 41 लाख; आता शेअर्स 10 भागांमध्ये होणार विभाजीत
शेअर बाजारात अनेक शेअर्सने मल्टीबॅगर परतावा देत गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक शेअर म्हणजे एराया लाइफस्पेस होय. हा शेअर आता 10 शेअर्समध्ये विभाजीत होणार असून, संचालक मंडळाने त्याच्या रेकॉर्ड तारखेची घोषणा केली आहे. या शेअर गेल्या शुक्रवारी 22 नोव्हेंबर 2024 रोजी 2101 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत होता.
ऑटो क्षेत्रातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी 2024 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यापैकी एक कंपनी आहे एराया लाइफस्पेस होय. या कंपनीच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत कालावधीत 1700 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच, दीर्घकालीन हा परतावा 27000 टक्क्यांहून अधिक आहे. अलिकडच्या वर्षांत शेअरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे कंपनीच्या प्रवर्तकांनी प्रथमच शेअर स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी संचालक मंडळाने शुक्रवारी आपल्या बैठकीत 1:10 स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली. त्याची रेकॉर्ड तारीख 6 डिसेंबर 2024 आहे. या बैठकीत शुक्रवारी हा शेअर 2101 रुपयांच्या पातळीवर होता. तो आदल्या दिवसाच्या तुलनेत 2.50 टक्क्यांनी जास्त बंद झाला.
कंपनीने स्टॉक एक्सचेंजला काय सांगितले
19 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आणि त्यानंतरच्या शेअर्सच्या मान्यतेनुसार शेअर विभाजनाच्या उद्देशासाठी रेकॉर्ड तारीखेची माहिती देण्यात आली होती, असे एराया लाइफस्पेसने भारतीय स्टॉक एक्सचेंजला सांगितले. ही रेकॉर्ड तारीख 6 डिसेंबर आहे. स्प्लिट प्रपोजल अंतर्गत गुंतवणूकदारांना एका ऐवजी 10 शेअर्स दिले जातील. गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या असे कॉर्पोरेट निर्णय घेत असतात.
किती परतावा मिळणार?
एराया लाइफस्पेसच्या शेअर्समध्ये गेल्या सहा महिन्यांत 175 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मल्टीबॅगर शेअर 2024 मध्ये 1700 टक्क्यांहून अधिक वाढला होता, तर एका वर्षात तो 2850 टक्क्यांहून अधिक वाढला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर्सची किंमत 72 रुपये होती. 4 ऑक्टोबर 2024 रोजी शेअरची किंमत 3000 रुपयांवर गेली होती. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये या शेअर्समध्ये केलेली 1 लाखाची गुंतवणूक ऑक्टोबर 2024 मध्ये 41.66 लाख इतकी झाली असेल.
पाच वर्षांत या मल्टीबॅगर शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27,600 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत 3169 रुपये तर निच्चांकी 69.59 रुपये आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे तर प्रवर्तकांकडे कंपनीचे 35.17 टक्के शेअर्स आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)