Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC Bank Loan Interest Rates : आता महाग होणार EMI… HDFC Bank च्या ग्राहकांना मोठा धक्का! बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर

HDFC Bank Loan Interest Rates : HDFC Bank ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला ताण देणारी बातमी समोर आली आहे. बनेकने आपल्या विविध मुदतीच्या कर्जावरील व्याजदरांमध्ये MCLR वाढ केली असून, यामुळे जुन्या आणि नव्या दोन्ही कर्जधारकांचा EMI महाग होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 11, 2026 | 06:56 PM
HDFC Bank च्या ग्राहकांना मोठा धक्का! ( सौजन्य - सोशल मीडिया )

HDFC Bank च्या ग्राहकांना मोठा धक्का! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आता महाग होणार EMI…
  • HDFC Bank च्या ग्राहकांना मोठा धक्का!
  • बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर
HDFC Bank Loan Interest Rates : HDFC Bank ने आपला MCLR (Marginal Cost of Funds-based Lending Rate) वाढवला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR मध्ये ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची (bps) वाढ केली आहे. परिणामी, जर तुमचे HDFC Bank कडून गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज असेल, तर त्याचा EMI आता अधिक महाग होईल. ( HDFC Bank Loan Interest Rates ) 

Central Government Subsidy : PM Kisanच्या 25 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! ‘या’साठी सरकार देणार तब्बल 62 हजार कोटी

हे नवीन दर ७ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, HDFC Bank चे नवीन MCLR दर आता ७.८५% वरून ८.७०% पर्यंत वाढले आहेत, जे पूर्वी ७.७५% ते ८.५५% दरम्यान होते.

बँकेचे विविध मुदतींसाठीचे MCLR दर

कर्ज मुदत  दर ऑक्टोबर २०२६ ७ नोव्हेंबर २०२६ पासून नवीन दर एकूण वाढ
ओव्हरनाइट ७.८०% ७.८५% ५ बीपीएस (०.०५%)
१ महिना  ७.७५% ७.८५% १० बीपीएस (०.१०%)
३ महिने ७.९५% ८.०५% १० बीपीएस (०.१०%)
६ महिने ८.१५% ८.३०% १५ बीपीएस (०.१५%)
१ वर्ष ८.३०% ८.४५%  १५ बीपीएस (०.१५%)
२ वर्षे ८.४०% ८.५५% १५ बीपीएस (०.१५%)
३ वर्षे ८.५५% ८.७०% १५ बीपीएस (०.१५%)

MCLR म्हणजे काय?

MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट) हा भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने निश्चित केलेला किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाही. याचा अर्थ, बँकांसाठी कर्ज देण्यासाठी हा मूळ दर आहे. जर तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज MCLR शी जोडलेले असेल, तर त्याचा तुमच्या कर्जाच्या व्याजदरावर किंवा कालावधीवर थेट परिणाम होईल.

पण, तुमचा EMI लगेचच वाढेल असे नाही. फ्लोटिंग रेट असलेल्या MCLR कर्जांसाठी एक निश्चित ‘व्याजदर रीसेट तारीख’ असते. त्यामुळे, तुमच्या कर्ज करारानुसार, तुमची पुढील रीसेट तारीख आल्यावरच तुमचा EMI वाढेल. तथापि, जर तुमचे कर्ज थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडलेले असेल, तर या MCLR वाढीचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.

MCLR रेपो रेटपेक्षा वेगळा का?

MCLR पूर्णपणे बँकेच्या अंतर्गत खर्चावर अवलंबून असतो. जर लोक बँकेत मुदत ठेवींमध्ये (FDs) कमी रक्कम जमा करत असतील, तर बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि अधिक निधी उभारण्यासाठी FD वरील व्याजदर वाढवते. आता, जेव्हा बँकेला एफडीवर अधिक व्याज द्यावे लागते, तेव्हा बँकेचा खर्च वाढतो. याची भरपाई करण्यासाठी, बँक आपला MCLR वाढवते.

रेपो रेट म्हणजे तो दर, ज्यावर आरबीआय देशातील बँकांना कर्ज देते. जर आरबीआयने रेपो रेट वाढवला, तर बँकांना पुढील काही महिन्यांत कर्जाचे व्याजदर वाढवावे लागतील. त्याचप्रमाणे, जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना व्याजदर कमी करावे लागतील.

India GDP Growth : जागतिक ऊर्जा संकटाच्या झटक्यानंतरही भारत भक्कम! अर्थव्यवस्था 7% च्या वेगाने धावणार; जागतिक अहवालाचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: HDFC बँकेने कर्जाच्या व्याजदरात किती वाढ केली आहे?

    Ans: बँकेने त्यांच्या विविध टेन्योरच्या MCLR दरांमध्ये वाढ केली असून, त्यानुसार सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढले आहेत.

  • Que: व्याजदर वाढीचा विद्यमान कर्जधारकांच्या ईएमआयवर काय परिणाम होईल?

    Ans: ज्या ग्राहकांचे लोन फ्लोटिंग रेटवर आहे, त्यांच्या कर्जाचा मासिक हप्ता किंवा कर्जाचा एकूण कालावधी वाढू शकतो.

  • Que: वाढलेल्या ईएमआयच्या समस्येपासून वाचण्यासाठी ग्राहक काय करू शकतात?

    Ans: ग्राहक बँकेशी संपर्क साधून लोनचे टेन्योर वाढवून घेऊ शकतात किंवा इतर बँकेत लोन ट्रान्सफर करण्याचा पर्यायही पडताळून पाहू शकतात.

Web Title: Hdfc bank loan interest rates hike emi expensive marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • HDFC Bank
  • Loan

संबंधित बातम्या

Instant Loan Apps Risk : पैशांची तातडीची गरज? 10 मिनिटांत मिळणारे इन्स्टंट लोन घ्यावे की नाही? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
1

Instant Loan Apps Risk : पैशांची तातडीची गरज? 10 मिनिटांत मिळणारे इन्स्टंट लोन घ्यावे की नाही? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

NBFC Gold Loan : आर्थिक गरजांसाठी सुवर्ण कर्जाची पसंती! NBFC वितरणात ५०% पेक्षा जास्त उसळी, RBI चे आकडे जाहीर
2

NBFC Gold Loan : आर्थिक गरजांसाठी सुवर्ण कर्जाची पसंती! NBFC वितरणात ५०% पेक्षा जास्त उसळी, RBI चे आकडे जाहीर

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा
3

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.