Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या काळात HDFC बँकची खास ऑफर ! ‘या’ क्रेडिट कार्डवर लागणार नाही वार्षिक शुल्क

एचडीएफसी (HDFC) बँकेने या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी क्रेडिट कार्डवर एक महत्वाची ऑफर आणली आहे. ज्यानुसार बँकेच्या ठराविक क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही . सविस्तर जाणून घेऊया विशेष ऑफरबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 01, 2024 | 02:37 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

देशात सर्वत्र दिवाळी जोरदार साजरी केली जात आहे. या दरम्यान ग्राहकांसाठी अनेक सवलतीच्या ऑफर्स कंपन्यांकडून दिली जातात. बॅंकाही आपल्या सेवेकरिता ग्राहकांना काही ऑफर्स देतात. काही नवीन उत्पादने, योजना बाजारात आणतात. एचडीएफसी (HDFC) बँकेने या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी एक महत्वाची ऑफर आणली आहे. एचडीएफसी बँक आपले काही लोकप्रिय क्रेडिट कार्ड कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय ग्राहकाना ऑफर करत आहे. याचा अर्थ असा की, तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी लागणारे वार्षिक शुल्क भरावे लागणार नाही. मीडीया रिपोर्टनुसार, ही ऑफर स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, टाटा न्यू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि टाटा न्यू इन्फिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत वैध असणार आहे.यापूर्वी, ग्राहकांना 31 ऑक्टोबरपर्यंत वार्षिक शुल्काशिवाय फ्रीडम क्रेडिट कार्ड आणि बिझफर्स्ट क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची संधी होती.

हे देखील वाचा-‘या’ प्रकारच्या Mutual Fund मध्ये मिळाला 29 टक्क्यांपर्यंतचा परतावा ! दिवाळीनिमित्त तुम्हीही सुरु करु शकतात गुंतवणूक

एचडीएफसी (HDFC)  बँकेचे क्रेडिट कार्डवरील असणारे शुल्क

टाटा न्यू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसाठी ग्राहकांना वार्षिक शुल्क 499 रुपये द्यावे लागते. तर टाटा न्यू इन्फिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 1,499 रुपये आणि स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 500 रुपये भरावे लागतात. या नवीन ऑफरमुळे ग्राहकांना ही रक्कम भरावी लागणार नाही.

क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क काय आहे?

ज्यावेळी तुम्ही कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड घेतात त्यावेळी तुम्हाला जॉइनिंग फी आणि वार्षिक शुल्क भरावे लागते. तुम्हाला फक्त एकदाच जॉइनिंग फी भरावी लागते. हे वार्षिक शुल्क  तुमच्या क्रेडिट कार्डवर दरवर्षी लागू होणारे सर्वात सामान्य कार्ड शुल्क आहेत. वार्षिक शुल्क हे तुम्हाला दरवर्षी भरावे लागते. प्रत्येक बँकांनुसार वार्षिक शुल्क वेगवेगळे असते. मात्र, काही बँका काही कालावधीकरिता  हे शुल्क आकारत नाहीत. त्याच वेळी, काही बँकांकडून ग्राहकांनी जर एका ठराविक रकमेच्या जास्त क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास त्या बँका तुम्हाला  वार्षिक शुल्कात सूट दिली जाते. त्यामुळे तुमचा  फायदा ही होतो.

हे देखील वाचा- LPG सिलिंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत…, 1 नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम

आवश्यकतेनुसार घेऊ शकता क्रेडिट कार्ड 

जर एचडीएफसी बँकेचे या योजनेचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असल्यास 31 डिसेंबरपर्यंत ही ऑफर वैध असणार आहे. त्याअगोदर हे कार्ड ग्राहकांनी घ्यायचे आहे. हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी बँकेकडून देण्यात आला आहे. या क्रेडिट कार्डचे लिमिट हे वेगवेगळे आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यापैकी कोणतेही क्रेडिट कार्ड घेऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला खरेदीवर चांगली सवलत ही मिळू शकते.

Web Title: Hdfc banks special offer during the festive season is no annual fee on some credit cards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Diwali
  • HDFC Bank

संबंधित बातम्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
1

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
2

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Diwali Bonus:   आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर
3

Diwali Bonus: आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर

‘यात्री कृपया ध्यान दे!’ आता मिळणार कन्फर्म तिकीट, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे चालवणार 12000 स्पेशल ट्रेन
4

‘यात्री कृपया ध्यान दे!’ आता मिळणार कन्फर्म तिकीट, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे चालवणार 12000 स्पेशल ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.