देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. या सर्वात मोठ्या सणानिमित्त तुम्ही योग्य गुंतवणूकही करु शकतात. मुळात दिवाळी हा सण गुंतवणुकीसाठी फार अनुकूल मानला जातो. त्यामुळ या सणामध्ये जर तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहे. त्यातील लार्ज आणि मिड कॅप फंड हा चांगला पर्याय ठरु शकतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या वेबसाइटनुसार, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फडाने एका वर्षात 29 टक्क्याहून जास्त परतावा दिला आहे.
लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांबाबत बोलायचे झाल्यास हा एक विशेष प्रकारचा इक्विटी फंड आहे. हा फंड भारतातील शीर्ष 200 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. यामध्ये लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचा समावेश आहे. ज्या देशातील प्रमुख आणि उदयोन्मुख व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात. या फंडाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता, यात गुंतवणूक केल्यास प्युअर लार्ज कॅप फंडांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो, कारण हा फंड स्थिरता आणि वाढीचा चांगला समतोल साधतो.
लार्ज कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड आणि परतावा
AMFI च्या वेबसाइटनुसार, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत, नऊ लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांनी मागील एका वर्षात 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. याच म्युच्युअल फंडापैकी क्वांट लार्ज आणि मिड कॅप फंडाने गेल्या 12 महिन्यांमध्ये 29 टक्के परतावा दिला आहे. बंधन कोअर इक्विटी फंडामधून 27 टक्के, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड कॅप फंड 26.03 टक्के, यूटीआय लार्ज आणि मिड कॅप फंड 26.02 टक्के, एचडीएफसी लार्ज आणि मिड कॅप फंड 26 टक्के, कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंडाने 25.04 टक्के, ॲक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज 25 टक्के परतावा दिला आहे. तसेच एडेलवाईस लार्ज आणि मिड कॅप फंडाने 24.49 टक्के परतावा दिला आहे, तर कॅनरा रोबेका इमर्जिंग इक्विटी फंडाने 24.35 टक्के परतावा दिला आहे यासोबतच मिरे ॲसेट लार्ज आणि मिडकॅप फंडाने 24 टक्के परतावा दिला आहे.
एसआयपी (SIP) ठरत आहे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय
म्युच्युअल फंडात तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक (Lumpsum) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एसआयपी हा पर्याय अनेकांकडून निवडण्यात येतो. ज्यामध्ये ठराविक रक्कम नियमित रित्या गुंतवण्यात येते. तसेच शेअर बाजारातीलधोकाही कमी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीमुळे कमी होतो. गुंतवणूकदारांना स्थिर परतावा मिळतो.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)