Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Breaking : ट्रम्प काही शांत बसेना; हल्ल्याचा इशारा केला जारी, इराणमध्ये आयोडीनच्या गोळ्यांचे वाटप

World Breaking : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती देणाऱ्यांसाठी अमेरिकेने २० दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, नतान्झ अणुप्रकल्पाजवळ नागरिकांना आयोडीनच्या गोळ्यांचे वाटप सुरू झाल्याच्या वृत्ताने चिंता वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 07, 2026 | 10:04 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प परीक्षा घेणार कि देणार
  • अमेरिकेचे बक्षीस
  • ब्रिक्स ने काय माहिती दिली
World Breaking : मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाने म्हणजे रिपब्लीकन या पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे . या निवडणुकीची खास बाब म्हणजे ज्या टेक्सास राज्यात रिपब्लिकन पक्षाचा दशकं झाली मोठा प्रभाव आहे . तिथेच ट्रम्प हरले आहेत . मी निवडून आल्यावर बाहेरच्या जमिनीवरील युद्ध बंद करून आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवूया , अमेरिकन नागरिकांचे जीवनमान उंचावूया , अशी भाषणे आणि वचने देऊन ट्रम्प सत्तेत आले . पण त्यांनी इराणवर हल्ला केला .

अमेरिकेत द्वेष आणि वर्णवादाचं राजकारण करायला सुरवात केली . इराण युद्धाचा फायदा अमेरिकेला काहीच झाला नाही . उलट नुकसान झाले . महागाई वाढली , युद्धावर अफाट खर्च झाला , पेट्रोल ,गॅसच्या किमती वाढल्या , अमेरिका ही फक्त श्वेतवर्णीयांसाठी आहे या भावनेला खतपाणी घातले . आपल्या जावयाचे व्यवसाय वाढतील असे निर्णय घेतले . व्हेनेझुएला एका रात्रीत ताब्यात घेऊन त्यावर आपल्या मर्जीचा माणूस बसवला .

इराणच्या लहान मुलींच्या शाळेवर हल्ला करून निष्पाप लहान मुलं मारली . युद्धाचे बरेचसे नियम मोडले . युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा सर्वांसमोर अपमान केला . ट्रम्प यांनी या दोन वर्षाच्या काळात वाट्टेल ते निर्णय घेतले . पण जेव्हा हे सगळे निर्णय अमेरिकेच्या जनतेला पटायचे बंद झाले तेव्हा अमेरिकेतील लोकांनी लोकशाही मार्गाने ट्रम्प यांना लगाम लावायची व्यवस्था केली . पण ऐकतील ते ट्रम्प कसले .

निकालानंतर अमेरिकेच्या सिनेट मध्ये जेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत जवळपास निश्चित झाले . त्यानंतर ट्रम्प यांनी एका सार्वजनिक वावरण्याच्या जागेवर डोक्यात एक लाल रंगाची टोपी घातली त्यावर लिहलं होतं मिस्टर व्हिटो याचा अर्थ असा कि डेमोक्रॅट्सनी कितीही मला बंधिस्त करायचा प्रयत्न केला तर मी माझा विशेष अधिकार म्हणजे व्हिटो वापरून मला हवं ते करू शकतो .

World News : अमेरिकेची मोठी घोषणा; इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती द्या आणि मिळवा २० दशलक्ष डॉलर

ट्रम्प परीक्षा घेणार कि देणार

मध्यावधी निवडणुकींमध्ये पराभव झाल्यानंतर ट्रम्प आता सौम्य होतील कि आणखी आक्रमक होतील याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे . कारण अमेरिकेचे निर्णय हे जगावर परिणाम करणारे असतात . पण सध्य स्थिती पाहता इस्रायल धार्जिणे लोकांचे अमेरिकेतील महत्व बघता .नेतान्याहू किंवा इस्रायली लॉबी ट्रम्प यांना इराणवर मोठा हल्ला करण्यासाठी तयार करू शकते .

पण दुसऱ्या बाजूला निवडणुकीतील पराभवामुळे ट्रम्प यांचे सल्लागार आता सावध भूमिका घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे आणि ट्रम्प यांना सुद्धा हाच सल्ला देत असल्याचे बोलले जात आहे . कारण अमेरिकेच्या बहुतांश लोकांचे असे मत झाले आहे कि अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध हे बेकायदेशीर आहे .

यामुळे ट्रम्प आता कोणत्या बाजूने निर्णय घेतात हे अजून तरी कळायला मार्ग नाही . तसेच आता इस्रायली लॉबीच्या मनातला सल्ला ऐकून निर्णय घेतात कि स्वतःच्या सल्लागारांचा यावर ते परीक्षा घेणार कि देणार असे वातावरण निर्माण झाले आहे .

SCO 2026 : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान नवी दिल्लीकडून पाकिस्तानला निमंत्रण; एससीओ परिषदेला हजार राहणार का शहबाज शरीफ?

अमेरिकेचे बक्षीस

निवडणुकीत हरल्यामुळे ट्रम्प शांत होतील असे वाटले होते पण तसे होताना दिसत नाही . कारण लगेचच ट्रम्प यांनी इराणच्या अणुसाहित्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला २ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले . वरून माहिती सांगणाऱ्या व्यक्तीला वेळ पडल्यास म्हणजे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्या व्यक्तीची सुरक्षित ठिकाणी ठेवून काळजी सुद्धा घेतली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे . ट्रम्प यांना काहीही करून इराणची अणुप्रकल्पाची खरी माहिती असल्याचे आणि त्याचे अत्यंत गरजेचे हे लक्षण आहे .

ब्रिक्स ने काय माहिती दिली

या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स न्यूज ने रशियाने इराणला गुप्तपणे काही महत्वाची क्षेपणास्त्रे पुरवली आहेत असा दावा केला आहे . तसेच रशियाने सुद्धा इराणवर अणुहल्ला झाला तर या युद्धात उघडपणे सामील होईल हा सुद्धा दावा लोक करत आहेत . याचदरम्यान इराणने नतान्झ अणुभट्टीजवळ राहणाऱ्या लोकांना किरणोत्सर्गापासून वाचवण्यासाठी आयोडीनच्या गोळ्यांचे वाटप केले आहे . तर डोंगराखाली त्यांनी वर्षभर पुरतील असा अन्नसाठा आणि राहण्याची व्यवस्था केली असल्याचा दावा सुद्धा ब्रिक्स न्यूज ने केला आहे . या सगळ्या हालचालींना बघून राजकीय विश्लेषक याला वादळापूर्वीची शांतता असे नाव देत आहेत .

 

Web Title: World breaking trump iran attack warning iodine tablets distribution natanz nuclear facility cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Iran News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News :१९४८ पासून ग्रामविकासाचा वारसा जपणारे लोहारी सावंगा; ७८ वर्षांची ग्रामपंचायत परंपरा
1

Nagpur News :१९४८ पासून ग्रामविकासाचा वारसा जपणारे लोहारी सावंगा; ७८ वर्षांची ग्रामपंचायत परंपरा

Nagpur News : मुख्यमंत्र्यांची दिवाळी लोहारी सावंग्यात! शेतकऱ्यांसोबत साजरा करणार सण; संत्रा उत्पादकांसह ग्रामस्थांना प्रश्न मांडण
2

Nagpur News : मुख्यमंत्र्यांची दिवाळी लोहारी सावंग्यात! शेतकऱ्यांसोबत साजरा करणार सण; संत्रा उत्पादकांसह ग्रामस्थांना प्रश्न मांडण

US Election Impact Elon Musk : अमेरिकन निवडणुका मस्क यांच्या अंगलट? काही दिवसांत 10 लाख कोटींचं नुकसान, चौकशीचीही टांगती तलवार
3

US Election Impact Elon Musk : अमेरिकन निवडणुका मस्क यांच्या अंगलट? काही दिवसांत 10 लाख कोटींचं नुकसान, चौकशीचीही टांगती तलवार

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री
4

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.