सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली हे मराठी इंडस्ट्रीतलं सगळ्यात लाडकं कपल आहे. त्यांच्या ट्रिपचे व्हिडीओ तर कायम व्हायरल होतातच, पण आता त्यांनी आपल्या नवीन घराची झलक दाखवलीय आणि ती बघून सगळेच खुश झालेत. काही महिन्यांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली होती. त्यावेळी त्यांनी नव्या घरात गुढी उभारल्याचा व्हिडीओ टाकला होता. आता दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी 20 फोटोंचा पूर्ण होम टूर शेअर केलाय. चला बघूया, त्यांचं ड्रीम होम आतून कसं दिसतं.
लिव्हिंग रूम आणि त्यांचा लाडका कुत्रा- पहिल्याच फोटोत त्यांचा ब्राऊन रंगाचा पूडल कुत्रा हिरव्या ओट्टोमनवर बसलाय. मागे सिद्धार्थ आणि मिताली हिरव्या सोफ्यावर हसत बसलेत. भिंतीवर बीच थीमचं पेंटिंग आहे. घरात शिरताच एकदम उबदार आणि हसतमुख वातावरण वाटतं. हा फोटो बघूनच कळतं, हे घर फक्त दिसायला नाही तर जगायला पण भारी आहे.
मातकट रंगाचं मुख्य दार- दुसऱ्या फोटोत त्यांच्या घराचं मुख्य दार दिसतंय. मातकट म्हणजे टेराकोटा रंगाचं हे दार आहे. त्यावर स्टीलचं ग्रील नाही, पण डिजिटल लॉक आहे. बाजूला मोठी हिरवी झाडाची कुंडी आणि लाकडी आर्च फ्रेम आहे. एंट्रीच इतकी सुंदर केलीय की घरात पाय ठेवताच वेगळंच वाटतं. ह्याच दारावरून त्यांनी घराचं नाव ठेवलंय, "द टेराकोटा हाऊस".
डायनिंग आणि कॉफी कॉर्नर- तिसऱ्या फोटोत त्यांचा डायनिंग नूक आहे. गोल लाकडी टेबल, बाजूला बँक्वेट सीटिंग, त्यावर निळ्या-हिरव्या पॅटर्नचं कापड. वर विकरचा दिवा लावलाय. भिंत पण टेराकोटा रंगाचीच आहे. बाजूलाच त्यांचं कॉफी स्टेशन आहे. पुदिन्याच्या रंगाचं एस्प्रेसो मशीन, लाकडी शेल्फवर कप, बरण्या, छोटी झाडं. खाली हिरवं कॅबिनेट. सकाळी इथे बसून कॉफी प्यायला काय मजा येत असेल.
लिव्हिंग रूमचा पूर्ण लूक- चौथ्या फोटोत पूर्ण लिव्हिंग रूम दिसतोय. हिरवा बुकले सोफा, लाकडी कॉफी टेबल, टीव्ही टेराकोटा भिंतीवर. मोठी खिडकी असल्यामुळे घरात भरपूर उजेड येतोय. वर लाकडी बीमचं सीलिंग आहे. टीव्हीच्या खाली लाकडी कन्सोल, बाजूला मोठं हिरवं झाड, फुलांचा वास, मेणबत्ती. सगळं एकदम नीट आणि प्रेमाने लावलंय असं वाटतं.
टेराकोटा किचन- पाचव्या फोटोत त्यांचं किचन आहे. टेराकोटा रंगाची कॅबिनेट्स, पॅटर्न असलेली बॅकसाईडची टाईल, लाल रंगाचा ओव्हन. फ्रिजवर मॅग्नेट्स लावलेत. दुसऱ्या कोपऱ्यात सॅल्मन-पिंक रंगाची कॅबिनेट्स, लाल मोकापॉट, लाकडी काउंटरटॉप. मसाल्याचे डब्बे पण एकदम नीट लावलेत. ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असा भारी मिक्स आहे.
बेडरूम - वेव्ही हेडबोर्ड वाला बेडसहाव्या फोटोत त्यांची बेडरूम आहे. हॉलिवूड लाईट्स असलेली व्हॅनिटी, केन डिटेल असलेलं वॉर्डरोब. पण सगळ्यांचं लक्ष जातंय ते बेडकडे. वेव्ही हेडबोर्ड असलेला बेड, त्यावर हिरवी बेडशीट. एका फोटोत मिताली पांढऱ्या लाऊंजवेअरमध्ये तिच्या कुत्र्याला घेऊन बेडवर बसलीय. तो फोटो खूपच क्युट आहे.
बाथरूम - ट्रॉपिकल लूक- शेवटच्या फोटोंमध्ये त्यांचं बाथरूम आहे. बोल्ड ऑरेंज रंगाच्या भिंती, ट्रॉपिकल पानांचं वॉलपेपर, हिरवा वेसल सिंक आणि आत बसता येणारा बाथटब. बाथरूम पण त्यांनी एकदम वेगळं आणि हटके केलंय.
शेवटच्या फोटोत परत लिव्हिंग रूममध्ये सिद्धार्थ-मिताली हिरव्या सोफ्यावर एकमेकांना मिठी मारून बसलेत आणि खाली त्यांचा कुत्रा आहे. हेच आहे त्यांचं खरं ड्रीम होम.गोरेगावमधलं आधीचं घर व्हाईट थीमचं होतं. आता हे दुसरं घर पूर्ण टेराकोटा थीमचं आहे. मितालीच्या फॅशन सेन्ससारखाच तिचा इंटिरियर सेन्स पण भारी आहे, असं चाहते म्हणतायत. तुम्हाला त्यांचं हे नवीन घर कसं वाटलं?