2025 मध्ये किती दिवस शाळा, ऑफिस आणि बँका राहणार बंद (फोटो सौजन्य-X)
Holidays List News In Marathi: 2024 या वर्षाचा शेवटचा महिना संपत आला आहे. काही दिवसातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरु झाल्यावर रविवार आणि शनिवार वगळता इतर अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. याचदरम्यान सरकारकडून नवीन वर्षाच्या कॅलेंडरमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. 2025 मध्ये 17 सार्वजनिक सुट्ट्या आणि 34 प्रतिबंधित (पर्यायी) सुट्ट्या असतील. एकंदरीत कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजेव्यतिरिक्त ४१ सुट्या मिळणार आहेत. यावर्षी एकूण ५२ रविवार आहेत. तसेच, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या स्वरुपात 26 शनिवार सुट्ट्या असतील. सामान्य सरकारी कर्मचाऱ्याला 2025 मध्ये अंदाजे 98-100 सुट्ट्या (सार्वजनिक, रविवार आणि शनिवारसह) मिळतील.
बहुतेक सुट्ट्या जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये आहेत. जसे की गुरु गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, लोहरी, पोंगल आणि प्रजासत्ताक दिन जानेवारीत साजरे केले जातील. एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात या महिन्यात महावीर जयंती आणि गुड फ्रायडे आहे. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी आहेत. ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीपासून सुट्ट्या सुरू होत आहेत. या महिन्यात दसरा, दिवाळी आणि छठच्या सुट्ट्या असतील. सन 2025 मध्ये कर्मचाऱ्यांना काही लाँग वीकेंड देखील मिळतील. जानेवारी, मार्च, एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये सलग तीन ते चार सुट्या असतील. 2025 मध्ये शनिवार आणि रविवारच्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त शेअर बाजार 14 दिवस बंद राहणार आहे. म्हणजेच शेअर बाजारातही 14 दिवस सुट्टी असेल. नवीन वर्ष सुरु होण्यास अगदी काहीच दिवस उरले आहेत.याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिन: २६ जानेवारी (रविवार)
महाशिवरात्री: २६ फेब्रुवारी (बुधवार)
होळी: १४ मार्च (शुक्रवार)
ईद-उल-फित्र: 31 मार्च (सोमवार)
महावीर जयंती: 10 एप्रिल (गुरुवार)
शुभ शुक्रवार: 18 एप्रिल (शुक्रवार)
बुद्ध पौर्णिमा: 12 मे (सोमवार)
ईद-उल-जुहा (बकरीद): 7 जून (शनिवार)
मोहरम: 6 जुलै (रविवार)
स्वातंत्र्य दिन: 15 ऑगस्ट (शुक्रवार)
जन्माष्टमी: 16 ऑगस्ट (शनिवार)
मिलाद-उन-नबी (ईद-ए-मिलाद): 5 सप्टेंबर (शुक्रवार)
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस: २ ऑक्टोबर (गुरुवार)
दसरा: 2 ऑक्टोबर (गुरुवार)
दिवाळी (दीपावली): 20 ऑक्टोबर (सोमवार)
गुरु नानक यांचा जन्मदिवस: 5 नोव्हेंबर (बुधवार)
ख्रिसमस डे: 25 डिसेंबर (गुरुवार)
नवीन वर्ष: १ जानेवारी (बुधवार)
गुरु गोविंद सिंग जयंती: ६ जानेवारी (सोमवार)
मकर संक्रांती/माघ बिहू/पोंगल: १४ जानेवारी (मंगळवार)
बसंत पंचमी: २ फेब्रुवारी (रविवार)
गुरु रविदास जयंती: १२ फेब्रुवारी (बुधवार)
शिवाजी जयंती: १९ फेब्रुवारी (बुधवार)
स्वामी दयानंद सरस्वती जयंती: 23 फेब्रुवारी (रविवार)
होलिका दहन: १३ मार्च (गुरुवार)
दोलयात्रा: १४ मार्च (शुक्रवार)
राम नवमी: १६ एप्रिल (रविवार)
जन्माष्टमी : १६ ऑगस्ट (शुक्रवार)
गणेश चतुर्थी/विनायक चतुर्थी: २७ ऑगस्ट (बुधवार)
दसरा (सप्तमी): २९ सप्टेंबर (सोमवार)
दसरा (महाष्टमी): ३० सप्टेंबर (मंगळवार)
दसरा (महानवमी): १ ऑक्टोबर (बुधवार)
महर्षि वाल्मिकी जयंती: ७ ऑक्टोबर (मंगळवार)
करवा चौथ: १० ऑक्टोबर (शुक्रवार)
नरक चतुर्दशी: 20 ऑक्टोबर (सोमवार)
गोवर्धन पूजा: 22 ऑक्टोबर (बुधवार)
भावबीज: 23 ऑक्टोबर (गुरुवार)
प्रतिहार षष्ठी किंवा सूर्य षष्ठी (छठ पूजा): 28 ऑक्टोबर (मंगळवार)
गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिवस: २४ नोव्हेंबर (सोमवार)
नाताळ: 25 डिसेंबर (गुरुवार)
11 व 12 जानेवारीला शनिवार व रविवार सुट्टी आहे. 13 जानेवारीला सुट्टी घेतली तर 14 तारखेला मकर संक्रांतीची सुट्टी मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही 11 ते 14 जानेवारी या कालावधीत लाँग वीकेंडवर जाऊ शकता. 14 मार्चला होळी असून 15 आणि 16 फेब्रुवारीला शनिवार आणि रविवार सुट्टी आहे. अशा प्रकारे तीन दिवस लाँग ड्राईव्हवर जाता येते. त्याचप्रमाणे 29 आणि 30 मार्चला शनिवार-रविवार आणि 31 मार्चला ईद-उल-फित्रची सुट्टी आहे. म्हणजे तीन सुट्या एकत्र येत आहेत.
एप्रिलमध्ये दोन लाँग वीकेंड असतील. 12,13,14 आणि 18 एप्रिल हा शुभ शुक्रवार आणि 19-20 एप्रिल शनिवार आणि रविवार आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर 16 आणि 17 ऑगस्टला शनिवार आणि रविवारची सुट्टी असेल. 5 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी आहे, तर 6 आणि 7 सप्टेंबरला शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल.