Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Fraud Awareness: तुमचे एक चुकीचे ‘क्लिक’ आणि बँक खाते रिकामे! सुट्ट्यांच्या काळात सायबर चोरांपासून ‘असे’ वाचा

सुट्ट्यांच्या खरेदीच्या धावपळीत सायबर चोरटे तुम्हाला लुटू शकतात. कुरिअर स्कॅम आणि क्यूआर कोड फसवणुकीपासून वाचण्यासाठी फेडएक्सने दिलेल्या या टिप्स नक्की वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 17, 2025 | 08:26 PM
सुट्ट्यांच्या काळात सायबर स्कॅमपासून कसे वाचायचे? फेडएक्सचा महत्त्वाचा इशारा (Photo Credit - X)

सुट्ट्यांच्या काळात सायबर स्कॅमपासून कसे वाचायचे? फेडएक्सचा महत्त्वाचा इशारा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पार्सल अडकल्याचा मेसेज आलाय?
  • सायबर भामट्यांची नवी खेळी
  • फेडएक्सकडून महत्त्वाच्या टिप्स
सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात आपली धावपळ वाढते. याच संधीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. बनावट संदेश, आकर्षक ऑफर्स आणि कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. नामांकित कूरिअर कंपनी फेडएक्स (FedEx) ने नागरिकांना अशा फसव्या मेसेज आणि ई-मेल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

कशा प्रकारे केली जाते फसवणूक? (Holiday Scams)

सायबर चोरटे प्रतिष्ठित कंपन्यांचे लोगो आणि अधिकृत भाषेचा वापर करून हुबेहूब खरे वाटणारे संदेश पाठवतात. तुमचे पार्सल अडकले आहे किंवा डिलिव्हरीसाठी उशीर होत आहे, असे सांगून लिंकवर क्लिक करायला भाग पाडले जाते. कॅशबॅक किंवा बक्षीस मिळवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितले जाते. प्रत्यक्षात कोड स्कॅन करताच तुमच्या खात्यातून पैसे चोरीला जातात.

अविश्वसनीय ऑफर्स

मोबाईल किंवा गॅजेट्सवर मोठ्या सवलती देणाऱ्या बनावट वेबसाईट तयार केल्या जातात, जिथे पैसे भरल्यानंतर वस्तू कधीच मिळत नाही. बँक खाते ब्लॉक होण्याची धमकी देऊन ओटीपी (OTP) किंवा गोपनीय माहिती मागितली जाते.

हे देखील वाचा:FedEx Economic Impact Report: फेडएक्सचा जागतिक अर्थव्यवस्थेत $१२६ अब्ज डॉलर्सचा प्रभाव; भारतीय बाजारपेठ ठरली ‘डिजिटल हब’

सायबर स्मार्ट राहण्यासाठी या ‘स्मार्ट’ सवयी लावा

फेडएक्सने नागरिकांना “थांबा, विचार करा आणि मगच कृती करा” हा मोलाचा सल्ला दिला आहे:

१. लिंकवर क्लिक करू नका: अनोळखी किंवा फॉरवर्ड केलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन खात्री करा.

२. क्यूआर कोड स्कॅन करताना सावध राहा: पैसे मिळवण्यासाठी कोणताही क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नसते, हे लक्षात ठेवा.

३. गोपनीय माहिती शेअर करू नका: तुमचा ओटीपी, बँक तपशील किंवा कार्ड क्रमांक कोणालाही देऊ नका. बँका किंवा कुरिअर कंपन्या कधीही अशी माहिती मागत नाहीत.

४. सुरक्षा कवच: आपल्या सर्व महत्त्वाच्या खात्यांना ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) लावून सुरक्षित करा.

तक्रार कुठे करावी?

फेडएक्सच्या मते, फसवणूक करणारे नेहमीच गुंतागुंतीच्या पद्धती वापरत नाहीत; उलट, घाईघाईत कोणतीही तपासणी न करता निर्णय घेणाऱ्या लोकांनाच ते लक्ष्य करतात. त्यामुळे या हॉलिडे सीझनमध्ये, एखाद्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, पेमेंट करण्यापूर्वी किंवा काहीही स्कॅन करण्यापूर्वी क्षणभर थांबा आणि दोनदा विचार करा. सायबर फसवणुकीचा संशय आल्यास राष्ट्रीय सायबर फ्रॉड हेल्पलाइन 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवा. फेडएक्स सायबर जागरूकता आणि शिक्षण उपक्रमांना सातत्याने पाठिंबा देत असून, ग्राहक, लहान व्यवसाय आणि समुदायांना आजच्या वेगवान डिजिटल अर्थव्यवस्थेत सुरक्षितपणे काम करता यावे, यासाठी प्रयत्नशील आहे.

हे देखील वाचा: Axis Mutual Fund कडून ‘गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड’ ऑफ फंड्सची घोषणा; 20 तारखेला…

Web Title: How to protect yourself from cyber scams during the holidays a crucial warning from fedex

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 08:26 PM

Topics:  

  • Bank Holiday
  • Cyber Fraud
  • FedEx

संबंधित बातम्या

Cyber Crime News: आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड नेटवर्कचा भंडाफोड! सीबीआयने केली देशव्यापी कारवाई; १००० कोटींचा घोटाळा उघड
1

Cyber Crime News: आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड नेटवर्कचा भंडाफोड! सीबीआयने केली देशव्यापी कारवाई; १००० कोटींचा घोटाळा उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.