फेडएक्सचा जागतिक अर्थव्यवस्थेत $१२६ अब्ज डॉलर्सचा प्रभाव (Photo Credit - X)
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५: फेडएक्स कॉर्पोरेशनने आज आपला वार्षिक ‘ग्लोबल इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट’ (जागतिक आर्थिक प्रभाव अहवाल) प्रकाशित केला आहे. या अहवालात कंपनीच्या विशाल जागतिक नेटवर्कचा आणि २०२५ या वित्तीय वर्षातील नवोन्मेषाला (Innovation) चालना देण्यामधील भूमिकेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
डन अँड ब्रॅडस्ट्रीट (Dun & Bradstreet) या व्यवसायविषयक डेटा आणि विश्लेषण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या अभ्यासात, फेडएक्सचा व्यक्ती, उद्योग आणि समाजांवर झालेला सकारात्मक परिणाम म्हणजेच ‘फेडएक्स इफेक्ट’ ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.
राज सुब्रमणियम, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडएक्स कॉर्पोरेशन यांनी सांगितले की, “गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ फेडएक्सने अभिनव वाहतूक सेवांद्वारे जागतिक व्यापाराची दिशा ठरवली आहे, ज्यामुळे समुदाय एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. नवोन्मेषाची आमची संस्कृती, उत्कृष्ट सेवा देण्याच्या आमच्या टीमची निष्ठा आणि धाडसी कल्पनांमुळे, फेडएक्स नेटवर्कने या वर्षी वेगाने बदलणाऱ्या व्यापाराच्या परिस्थितीत आणि पुरवठा साखळीतील परिवर्तनांमध्ये जागतिक प्रगतीस चालना दिली.”
अहवालानुसार, फेडएक्सने २०२५ वित्तीय वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत थेट आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एकूण १२६ अब्ज डॉलर्सचा आर्थिक प्रभाव निर्माण केला. हे यश ‘वन फेडएक्स’ (One FedEx) या एकत्रित मॉडेल अंतर्गत कंपनीने केलेल्या सेवा सुधारणा आणि कार्यक्षमतेच्या प्रयत्नांचा पुरावा आहे.
फेडएक्स मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका (MEISA) या वेगाने वाढणाऱ्या प्रदेशांना जगभरातील २२० हून अधिक देश आणि प्रदेशांशी जोडते. या नेटवर्कमध्ये भारत हा उच्च-वाढीचा बाजारपेठीय केंद्रबिंदू आणि डिजिटल हब म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो, जो नवोन्मेष आणि कार्यक्षमतेस सतत चालना देत आहे. २०२५ वित्तीय वर्षादरम्यान, फेडएक्सने MEISA प्रदेशातील वाहतूक, साठवण आणि दळणवळण क्षेत्राच्या निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.१% थेट योगदान दिले. तसेच, प्रदेशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत ३३० दशलक्ष डॉलरचे अप्रत्यक्ष योगदान दिले, जे २०२४ वित्तीय वर्षामधील कंपनीच्या अप्रत्यक्ष परिणामाच्या तुलनेत १७% वाढ दर्शवते.
कामी विश्वनाथन, अध्यक्ष – मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका, फेडएक्स यांनी नमूद केले की, “भारतातील आमच्या नेटवर्कमधील वाढती भूमिका हे दाखवते की नवोन्मेष आणि क्षमता निर्माण केल्याने जागतिक व्यापाराचे स्वरूप बदलू शकते.” ते पुढे म्हणाले, “स्केलेबल एआय-आधारित साधनांचा वापर आणि वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी यांच्या साहाय्याने आम्ही भारतीय व्यवसायांना वस्तू अधिक जलद हलविण्यास, अधिक चतुराईने नियोजन करण्यास आणि अधिक जागतिक संधी मिळविण्यास सक्षम करत आहोत.”






