ॲक्सिस म्युच्युअल फंड (फोटो- istockphoto)
ॲक्सिस म्युच्युअल फंड देशातील आघाडीची व्यवस्थापन कंपनी
ॲक्सिस म्युच्युअल फंडने केली नवीन फंडची घोषणा
आयएफओ 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार
पुणे: देशातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडने आज ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह फंड ऑफ फंड (FoF) सुरू करण्याची घोषणा केली. ही ओपन-एंडेड फंड ऑफ फंड्स योजना असून, त्यामध्ये सोने आणि चांदीच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETF) च्या युनिट्समध्ये गुंतवणूक (Investment) केली जाणार आहे.
या योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी 10 डिसेंबर 2025 रोजी खुला होणार असून तो 22 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF याद्वारे गुंतवणूकदारांना एकाच गुंतवणूक पर्यायातून सोने आणि चांदी—जगभरात मूल्य साठवणुकीचे विश्वासार्ह माध्यम मानले जाणारे दोन प्रमुख कमोडिटीज—यांच्या कामगिरीत सहभागी होता येणार आहे.
ही योजना पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कमोडिटी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देईल. या योजनेत प्रामुख्याने गोल्ड ETF आणि सिल्व्हर ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक केली जाणार असून, दोन्ही कमोडिटीजमध्ये संतुलित वाटप (बॅलन्स्ड अलोकेशन) ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
योजनेच्या शुभारंभाबाबत बोलताना, बी. गोपकुमार, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी अँड सीईओ), ॲक्सिस एएमसी, यांनी सांगितले, “सोने आणि चांदी या ऐतिहासिकदृष्ट्या महागाई आणि चलनातील चढ-उतारांपासून संरक्षण देणाऱ्या प्रभावी गुंतवणूक ठरल्या आहेत. त्याचबरोबर, पोर्टफोलिओमध्ये विविधीकरणाचे फायदेही देतात. ॲक्सिस गोल्ड अँड सिल्व्हर पॅसिव्ह FoF च्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना भौतिक स्वरूपात धातू ठेवण्याच्या गुंतागुंतीशिवाय, या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहोत.”
सोनं-चांदीचे दर नरमले
भारतात 17 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,385 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,269 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,038 रुपये आहे. भारतात 17 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,380 रुपये आहे. भारतात 17 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 199 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,99,000 रुपये आहे.






