
LPG Cylinder च्या किमतीत पुन्हा वाढणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )
HPCLचे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केलं की, नोव्हेंबरमध्ये हा तोटा ३२७ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कंपन्यांना हा तोटा होत आहे. जगभरात अनेक आघाड्यांवर सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. याच कारणामुळे तेल विपणन कंपन्यांना प्रचंड तोटा होत आहे.
HPCL च्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केलं की, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत LPG सिलेंडरच्या विक्रीतून त्यांना ५०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सध्या, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी घरगुती सिलेंडर बाजारभावापेक्षा कमी दरात विकत आहेत, ज्यामुळे या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या, कंपन्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे. फक्त कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळेच समस्या येत नाहीत. तर वाढत्या मालवाहतूक खर्चाचा त्यांच्या ताळेबंदावरही परिणाम होत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुएझमॅक्स टँकरचे मालवाहतूक दर पहिल्या तिमाहीतील प्रति बॅरल ४ डॉलरच्या तुलनेत आता प्रति बॅरल ९ डॉलरवर पोहोचले आहेत. शिवाय, सध्याची परिस्थिती पाहता HPCL आपत्कालीन खरेदीचा विचार करत आहे. त्यामुळे त्याचा भार आणखी वाढत आहे.
HPCL ने गेल्या आठवड्यात आपले तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत ₹३,६२५.२२ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. पहिल्या तिमाहीत कंपनीला ₹१२,२६४.६७ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपनीच्या नफ्यात वार्षिक तुलनेत ६.१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा ₹३,८५९ कोटी इतका होता. कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक तुलनेत २६.१ टक्क्यांनी वाढून ₹१,३९,१४० कोटी झाला आहे. कंपनीने मागील वर्षी ₹१,१०,३२३ कोटी कमावले होते. पण सध्याची परिस्थिती बघता हा तोटा भरुन काढण्यासाठी LPG च्या किंमती वाढवण्याची परिस्थिती उभी राहते का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
(अस्वीकरण: शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
Ans: आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि देशांतर्गत नियंत्रित विक्री दर यांच्यातील फरकामुळे HPCL ला प्रति एलपीजी सिलिंडरमागे सध्या 245 रुपयांचे नुकसान होतंय.
Ans: कंपन्यांना तोटा होत असला तरी, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती थेट केंद्र सरकारकडून नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे दरवाढ होणार का, याचा अंतिम निर्णय सरकारवर निर्धारित आहे.
Ans: जागतिक स्तरावर एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, परंतु देशांतर्गत बाजारात ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.