Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IGI कडून AGLचे संपादन; रंगीत रत्न सर्टिफिकेशनमध्ये जागतिक स्तरावर नवा अध्याय

आयजीआयने रंगीत रत्न सर्टिफिकेशन क्षेत्रातील अग्रणी एजीएलचे संपादन केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या व्यवहारामुळे आयजीआयची जागतिक उपस्थिती आणि एजीएलची वैज्ञानिक तज्ज्ञता एकत्र येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 06:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) या जगातील आघाडीच्या स्वतंत्र डायमंड ग्रेडिंग आणि सर्टिफिकेशन संस्थेने अमेरिकन जेमोलॉजिकल लॅबोरेटरीज (AGL) या रंगीत रत्नांच्या विश्लेषण व ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ अहवालांसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेचे संपादन केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण व्यवहारामुळे आयजीआयची व्यापक जागतिक उपस्थिती आणि एजीएलची सखोल वैज्ञानिक तज्ज्ञता एकत्र येत असून, जागतिक हिरा व ज्वेलरी उद्योगात सर्टिफिकेशनच्या क्षेत्रात एक मजबूत, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असा प्लॅटफॉर्म उभा राहणार आहे.

डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग! काय असते संपूर्ण प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या

या संपादनामुळे रंगीत रत्न सर्टिफिकेशनमध्ये आयजीआयचे कार्यक्षेत्र लक्षणीयरीत्या विस्तारणार आहे. आयजीआयची अनेक देशांतील प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा आणि बाजारपेठांतील पोहोच, तर दुसरीकडे एजीएलचे रंगीत रत्नांवरील संशोधन, उत्पत्ती अहवाल आणि वैज्ञानिक अचूकता या दोन्हींची सांगड घालण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पारदर्शक, सुसंगत आणि उच्च दर्जाच्या सर्टिफिकेशन सेवा उपलब्ध होतील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयजीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी तेहमास्प प्रिंटर म्हणाले, “हा व्यवहार उद्योगासाठी परिवर्तनकारी ठरणार आहे. एजीएलचे रंगीत रत्नांमधील वैज्ञानिक नेतृत्व आणि आयजीआयचा जागतिक प्लॅटफॉर्म एकत्र आणत आम्ही प्रामाणिकता व विज्ञानाशी कोणतीही तडजोड न करता मोठ्या प्रमाणावर काम करू शकणारी सर्टिफिकेशन परिसंस्था उभारत आहोत. यामुळे रत्न सर्टिफिकेशनमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि सुसंगततेसाठी नवा जागतिक मापदंड निर्माण होईल.”

या व्यवहारातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायातील सातत्य. एजीएलचे अध्यक्ष आणि मुख्य जेमोलॉजिस्ट क्रिस्टोफर स्मिथ आपल्या पदावर कायम राहणार असून, एजीएलचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्येच कार्यरत राहील. एजीएल आपल्या स्वतंत्र ब्रँड ओळखीखाली काम करत राहणार असून, सध्याच्या तांत्रिक मानकांमध्ये किंवा ग्राहक सेवेत कोणताही तत्काळ बदल होणार नाही. दोन्ही संस्था संयुक्तपणे नवीन साधने, सुधारित अहवाल स्वरूपे आणि उगमक्षेत्राशी संबंधित सेवा विकसित करण्यावर भर देणार आहेत. शिक्षण आणि ज्ञानवृद्धीच्या दृष्टीनेही हे संपादन महत्त्वाचे ठरणार आहे. एजीएलच्या वैज्ञानिक संशोधन, प्रशिक्षण पद्धती आणि अध्यापन अनुभवाचा उपयोग करून आयजीआय आपले जागतिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सक्षम करणार आहे. यामुळे रंगीत रत्न क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना मिळेल.

परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज! किती कर्जाची आवश्यकता आहे? फुल ऑन गॅरंटी

ब्लॅकस्टोनच्या दीर्घकालीन गुंतवणूक दृष्टिकोनाच्या पाठबळावर आयजीआयने आतापर्यंत प्रयोगशाळा पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मानवी संसाधनांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हाच दृष्टिकोन एजीएलच्या वाढीसाठी आणि रंगीत रत्न सर्टिफिकेशनमधील जागतिक नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. १९७७ मध्ये स्थापन झालेल्या एजीएलने अमेरिकेत रंगीत रत्नांसाठी ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ अहवाल प्रणालीची सुरुवात केली होती. आज एजीएल जगभरातील लक्झरी ब्रँड्स, नामांकित लिलावगृहे, उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि खासगी संग्राहकांना सेवा पुरवते. या संपादनामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक दुवा अधिक बळकट होणार असून, जागतिक रत्न व्यापाराच्या बदलत्या गरजांना उत्तर देण्यासाठी एक सशक्त, विश्वासार्ह आणि आधुनिक सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्म तयार होणार आहे.

Web Title: Igl acquires agl marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

JEE टॉपरसाठी IIT सीएसई ही पहिली पसंत का असते? टॉप इन्स्टिट्यूटचे ओपनिंग आणि क्लोजिंग रँक जाणून घ्या…
1

JEE टॉपरसाठी IIT सीएसई ही पहिली पसंत का असते? टॉप इन्स्टिट्यूटचे ओपनिंग आणि क्लोजिंग रँक जाणून घ्या…

Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा
2

Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

राज्याच्या त्रैमासिक GSDP साठी नाऊकास्टिंगचा अभ्यास; मुंबई विद्यापीठाकडे महत्त्वाचा प्रकल्प
3

राज्याच्या त्रैमासिक GSDP साठी नाऊकास्टिंगचा अभ्यास; मुंबई विद्यापीठाकडे महत्त्वाचा प्रकल्प

ITI आधुनिक ‘स्किल डेव्हलपमेंट हब’ म्हणून विकसित केले जाणार! मंत्री लोढांनी दिला विश्वास
4

ITI आधुनिक ‘स्किल डेव्हलपमेंट हब’ म्हणून विकसित केले जाणार! मंत्री लोढांनी दिला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.