Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Career: अपशिंगे येथील शाळेत ४६८, अंगापूर येथे सुमारे २००, तर वर्णे येथील शाळेत २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत तिन्ही शाळांसाठी एकूण नऊ शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याचे धस्के यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 06:56 PM
Career News

Career News

Follow Us
Follow Us:
  • मॉडेल स्कूलसाठी लाखोंचा निधी, मात्र शिक्षकांची वानवा
  • प्रवीण धस्के यांचा शिक्षण विभागावर आरोप
  • तातडीने शिक्षक न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सातारा/Career: सातारा जिल्हा परिषदेच्या वर्णे गटातील अंगापूर, वर्ये आणि अपशिंगे येथील मॉडेल स्कूलवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण धस्के यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या तिन्ही शाळांमध्ये तातडीने शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अपशिंगे येथील शाळेत ४६८, अंगापूर येथे सुमारे २००, तर वर्णे येथील शाळेत २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत तिन्ही शाळांसाठी एकूण नऊ शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याचे धस्के यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्याकडे दिशा समितीच्या बैठकीत दोन वेळा पाठपुरावा केला. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी नायकवडी यांच्याकडे तीन वेळा बैठकीतून शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, अद्याप शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप धस्के यांनी केला.

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न

जिल्हा परिषदेच्या स्मार्ट स्कूलमध्ये या तिन्ही शाळांचा समावेश असतानाही संबंधित शाळांना केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी उपलब्ध नसल्याचा मुद्दाही धस्के यांनी उपस्थित केला. लाखो रुपयांचा निधी खर्च करून शाळांचा भौतिक विकास केला जात असेल, तर त्याचबरोबर शैक्षणिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची नाही का, असा सवाल त्यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतही धस्के यांनी टीका केली. त्यांच्या केबिनमध्ये जाण्यास पदाधिकारीही धजावत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन नायकवडी यांना तेथून हटवावे आणि जबाबदार शिक्षणाधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

सीएसआरच्या ५० लाखांच्या निधीची चौकशी करा

या तिन्ही शाळांना सीएसआरच्या माध्यमातून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे धस्के यांनी सांगितले. ज्या व्यक्ती अथवा संस्थांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला, त्यांच्या नावाचा उल्लेख शाळांमध्ये करण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रशासकीय कालावधीत झालेल्या टेंडर प्रक्रियेची मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धस्के यांनी दिला. तसेच सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या जागा वाचविण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची भूमिकाही त्यांनी जाहीर केली.

Web Title: Pravin dhaske demand recruit teaches urgently in satara zp schools career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Career
  • Satara News
  • Teacher Recruitment
  • Teachers

संबंधित बातम्या

साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक
1

साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक

अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई
2

अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ
3

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
4

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.