
तत्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! (Photo Credit - AI)
पायलट प्रोजेक्टनंतर पूर्ण लागू
इंडियन रेल्वेने हा नवा नियम लागू करण्यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२५ पासून रिझर्व्हेशन काउंटरवर बुक केलेल्या तत्काळ तिकीटांसाठी ओटीपी सिस्टीमचा प्रायोगिक तत्वावर (Pilot Trial) वापर सुरू केला होता. या पायलट फेजमध्ये, ही सिस्टीम ५२ गाड्यांमध्ये लागू करण्यात आली होती. या प्रायोगिक अंमलबजावणीमध्ये यश मिळाल्यानंतर, आता ही प्रणाली पूर्णपणे लागू करण्याची तयारी सुरू आहे.
हे देखील वाचा: गुंतवणूकदारांनो तयारीत रहा! 8 डिसेंबरला उघडणार ‘हा’ IPO; आकडे वाचून फुटेल घाम
नवीन सिस्टीममध्ये तिकीट बुकिंग कसे होईल?
नवीन नियम लागू झाल्यानंतर काउंटरवर तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाला पुढील प्रक्रिया करावी लागेल. प्रवाशाला आपल्या फॉर्मवर स्वतःचा मोबाईल नंबर नमूद करावा लागेल. याच मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. काउंटर स्टाफने हा ओटीपी योग्यरित्या वेरिफाय (Verify) केल्यानंतरच तिकीट बुक होईल.
रेल्वेने हे पाऊल का उचलले?
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे आता ही सिस्टीम बाकी सर्व गाड्यांमध्ये लागू करत आहे. यामुळे तत्काळ तिकीटाचा गैरवापर थांबेल आणि खऱ्या गरजू प्रवाशांना सहज तिकीट मिळेल याची खात्री करता येईल. हा निर्णय रेल्वे तिकीटिंगला अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोपे बनवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.
ऑनलाइन तत्काळ तिकीट कसे बुक करावे?