वेकफीट आयपीओ हाेणार खुला (फोटो- istockphoto)
इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री सोमवारपासून सुरू होणार
प्रति इक्विटी शेअर 195 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित
वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेडचा आयपीओ होणार लॉंच
पुणे: वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री (IPO) सोमवार 8 डिसेंबर 2025 पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे शुक्रवार 5 डिसेंबर 2025 आहे.
बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 185 रुपये ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर 195 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 76 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 76 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि नोमूरा फायनान्शियल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
आयपीओमधील पैसे संपल्यामुळे बँक कर्जाची मागणी वाढणार
भारतातील बँकिंग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका नवीन अहवाल सादर केले आहे. एसबीआयने त्या अहवालात असे म्हटले आहे की, काही काळापासून मंदावलेले बँक कर्ज वाटप आता पुन्हा वाढणार आहे. कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी निधीची आवश्यकता असल्याने कर्जाची मागणी देखील वाढण्याची शक्यता असल्याचे, त्यांनी अहवालात म्हटले आहे.
एसबीआयने स्पष्ट केले आहे की, कर्ज मागणीत अलिकडेच झालेली घट ही मोठी समस्या नव्हती, तर ती तात्पुरती होती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेअर बाजारात आयपीओचा पूर आला होता. अनेक कंपन्यांनी आयपीओद्वारे भरपूर पैसे उभारले होते. त्यामुळे कंपन्या जास्त प्रमाणात कर्ज घेत नव्हती.
Stock Market Today: भारतीय शेअर बाजारत आज ‘हे’ स्टॉक्स गुंतवणूकदारांना देणार नफा! जाणून घ्या सविस्तर
जेव्हा भारतीय कंपनीच्या खिशात स्वस्त आयपीओ पैसे होते, तेव्हा कंपन्यांना वाटले की, बँकांकडून कर्ज का घ्यावे आणि व्याज का द्यावे? त्यांनी त्या पैशाचा वापर त्यांचे व्यवहार मिटवण्यासाठी आणि जुने कर्ज फेडण्यासाठी केला. म्हणूनच बँक व्यवसाय थोडा मंदावला होता. मात्र, आता एसबीआयच्या ताज्या अहवालानुसार, आयपीओचे पैसे जवळजवळ खर्च झाले आहेत, त्यामुळे कंपन्यांना पुन्हा बँकांशी संपर्क साधावा लागेल. यामुळे मात्र भारतीय बँक क्षेत्रात आनंदाची लाट आली आहे.






