मध्य रेल्वेने सात महिन्यांत तब्बल २३.७६ लाख प्रवाशांना विनातिकिट किंवा अवैध तिकिटासह प्रवास करताना पकडले. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या २२.०९ लाख होती, ज्यात ८ टक्के वाढ नोंदवली गेली.
Bath In Train Video : लाज न लज्जा व्यक्तीने ट्रेनमध्ये सर्वांसमोर केले लज्जास्पद कृत्य, रेल्वेला घर समजत दरवाजासमोरच आटोपली आंघोळ, पाहून सर्वांनाच बसला धक्का. व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने कठोर…
सध्या मुंबईला जाणाऱ्या सर्वच एक्स्प्रेस गाड्या बाराही महिने हाउसफुल्ल असतात. या गाड्यांचे तिकीट मिळणे मुश्कील असते. सांगली, मिरजेसाठी या गाड्यांना मर्यादित कोटा असल्याचा फटका बसतो.
वंदे भारत एक्सप्रेस तिच्या वेग, आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. आता ही सुविधा नांदेड-पुणे मार्गावर उपलब्ध होणार असल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार आहेत.
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि प्रत्येक वेळी खालच्या बर्थसाठी संघर्ष करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने खालच्या बर्थ आरक्षणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे…
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरच्या रात्री तिकीट बुकिंगपासून चौकशीपर्यंत रेल्वेची संपूर्ण आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार आहे. सिस्टीम अपग्रेडमुळे होणाऱ्या या शटडाऊनचा परिणाम कोणत्या सेवांवर होईल?
सण आणि सुट्टीच्या काळात वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील ७६ रेल्वे स्थानकांवर नवीन प्रवासी होल्डिंगसाठी मंजुरी
बंगालच्या उपसागरात 'मोंथा' चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ६० हून अधिक ट्रेन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना फटका बसला असून, रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण यादी येथे पाहा.
Mumbai-Goa Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या सेवेमुळे मराठवाडा आणि पुणे यांच्यातील व्यापार, शिक्षण आणि पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. पुण्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय मिळेल.
देशभरात 12000 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये पूर्व किनारी रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ३६७ विशेष गाड्यांचा समावेश आहे, त्यापैकी ७६ आधीच सुरू झाल्या आहेत.
विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या वेळी घरी जाणाऱ्या प्रवाशांना या अनपेक्षित विलंबाचा फटका बसला. प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.
दिवाळी 2025 साठी भारतीय रेल्वेने पुणे, हरंगुल, हजरत निजामुद्दीन, भुवनेश्वर, यशवंतपूर, धनबाद, कडप्पा, गुंटकल, पुरी, पाटणा यासह अनेक मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या आहेत, जाणून घ्या तपशीलवार माहिती
भारतीय रेल्वे सर्वात आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण, यातील बहुतांश प्रवासी हे विनातिकिट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
धोकादायक ठिकाणी बाउंड्री वॉल बांधकामासाठी अभियांत्रिकी विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
मंत्रिमंडळाने आज चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली, ज्यामुळे विद्यमान रेल्वे नेटवर्क चार ते सहा पदरी होतील, ज्याचा एकूण खर्च ₹२४,६३४ कोटी आहे. या प्रकल्पांमध्ये चार राज्यांमधील १८ जिल्ह्यांचा समावेश आहे
पॅलेस ऑन व्हील्स हा प्रवास म्हणजे फक्त गंतव्यस्थान गाठण्याचा अनुभव नाही, तर तो एक ऐश्वर्यपूर्ण सफर आहे, जिथे प्रत्येक क्षण राजेशाही भासतो. ज्यांना इतिहास, संस्कृती आणि लक्झरी यांचा संगम अनुभवायचा…
दिवाळी आणि छठ पूजा यांसारख्या सणांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. पण आता या समस्येवर एक सोपा उपाय उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने UTS मोबाइल ॲप (अनारक्षित तिकीट प्रणाली) लाँच केले…