
India 5G Network: डिजिटल भारताची झेप! 5G वापरात भारत जगात 'या' क्रमांकावर
India 5G Network: भारताने आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला आहे. भारत केवळ 5G नेटवर्क वापरकर्त्यांच्या संख्येत आघाडीवर नाही तर सर्वांत वेगाने स्वीकारणाऱ्या देशांमध्येही स्थान मिळवले आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरणारा देश असून ४० कोटींहून अधिक लोक 5G सेवा वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. आता 5G च्या बाबतीत फक्त चीनच भारताच्या पुढे आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये दिली आहे.
400 million 5G users & counting… 🇮🇳 With over 400M+ 5G users, India today stands as the world’s second-largest 5G subscriber base and among the fastest adopters globally. Under the visionary leadership of Hon’ble PM Shri @narendramodi, India’s 5G story is setting new global… pic.twitter.com/nUqUwVqg9U — Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) January 16, 2026
हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर पुन्हा वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर
भारतात २०२२ साली 5G नेटवर्क लाँच झाले होते आणि आता देशातील ९९.६ टक्के जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे. फाईव्ह जी कव्हरेज ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. मार्च २०२५ पर्यंत, दूरसंचार कंपन्यांनी देशभरात ४,६९,००० 5G बेस ट्रान्सीव्हर स्टेशन स्थापित केले आहेत. दूरसंचार मंत्रालयाच्या मते, हे जगातील सर्वांत जलद 5G नेटवर्क रोलआउटपैकी एक आहे. 5G लाँच झाल्यापासून, जवळजवळ २५० दशलक्ष मोबाइल वापरकर्त्यांनी 5G सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे. दूरसंचार कनेक्शन केवळ शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भारतातही वेगाने वाढले आहेत. ग्रामीण टेलिफोन कनेक्शन ४२.९ टक्क्यांनी वाढले आहेत, जे शहरी भागातील वाढीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. २०१४ मध्ये ग्रामीण कनेक्शन ३७.७८ कोटी होते, जे सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढून ५३.९८ कोटी झाले.
हे देखील वाचा: Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा
इंटरनेट वापरकत्यांची संख्या देखील एक नवीन विक्रम प्रस्थापित झाली आहे. देशातील इंटरनेट कनेक्शनची एकूण संख्या आता १००.२९ कोटी झाली आहे. मार्च २०१४ मध्ये ही संख्या फक्त २५.१५ कोटी होती, म्हणजे अंदाजे २९९१% ची मोठी वाढ. भारत स्वतःचा 4G नेटवर्क स्टॅक असलेला जगातील पाचवा देश बनला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान 5G मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. शहरांपासून ते गावांपर्यंत, हाय-स्पीड इंटरनेट अधिकाधिक भागात पोहोचले.