Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये जगातील पहिले ‘AI’ रुग्णालय! भरती करण्यापासून ते उपचार आणि फॉलोअपपर्यंत सर्व सुविधा

चीनने जगातील पहिले 'एआय हॉस्पिटल' सुरू केले आहे. यामध्ये ४२ एआय डॉक्टर २४ तास कार्यरत असतील.या एआय रुग्णालयाने अवघ्या काही दिवसांत १०,००० पेक्षा जास्त आभासी रुग्णांवर उपचार केले.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 02:25 PM
चीनमध्ये जगातील पहिले 'एआय' रुग्णालय! भरती करण्यापासून ते उपचार आणि फॉलोअपपर्यंत सर्व सुविधा

चीनमध्ये जगातील पहिले 'एआय' रुग्णालय! भरती करण्यापासून ते उपचार आणि फॉलोअपपर्यंत सर्व सुविधा

Follow Us
Close
Follow Us:

हेल्थकेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सातत्याने प्रगती करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने जगातील पहिले ‘एआय हॉस्पिटल’ सुरू केले आहे. यामध्ये ४२ एआय डॉक्टर २४ तास कार्यरत असतील. ‘सिंधुआ युनिव्हर्सिटी’ च्या इन्स्टट्यूट फॉर एआय इंडस्ट्री रिसर्चने विकसित केलेली ‘एजंट हॉस्पिटल’ नावाची ही सुविधा २१ वैद्यकीय विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करते. एआय-चालित वैद्यकीय सेवेच्या दिशेने चीनचे हे पाऊल एक मोठी झेप मानले जात आहे. ‘एजंट हॉस्पिटल’ मध्ये एआय डॉक्टर आणि परिचारिका ‘लार्ज लँग्वेज मॉडेल पावर्ड इंटेलिजेंट एजंट’द्वारे काम करतात.(फोटो सौजन्य – AI)

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

जे स्वायत्त संवादासाठी सक्षम आहेत. ही प्रणाली रुग्णाच्या देखभालीचा प्रत्येक टप्पा कव्हर करते; ज्यामध्ये रुग्णालयात येण्यापूर्वीची प्रक्रिया, ट्रायजिंग (रुग्णांचे वर्गीकरण) आणि नोंदणीपासून ते सल्लामसलत, तपासणी, निदान, प्रिर्सक्रिप्शन, पुनर्वसन आणि फॉलोअपचा समावेश आहे. अवाढव्य वैद्यकीय साहित्याचे विश्लेषण करून आणि अनुभवातून शिकून हे एआय डॉक्टर आपली निदान आणि उपचार कौशल्ये स्वतःहून सुधारतात.

वैद्यकीय क्षेत्रातील फायदे

सिंधुआ युनिव्हर्सिटीमधील या प्रकल्पाचे मुख्य संशोधक लियू यान यांनी याला आरोग्य सेवेतील क्रांतिकारी पाऊल म्हटले आहे. यान यांच्या मते, है रुग्णालय डॉक्टरांच्या आजार निदान आणि उपचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांवरील कामाचा ताण कमी होईल. तसेच निदानातील चुका कमी होतील आणि उपचारांमध्ये सातत्य येईल.

संशोधक पथक सध्या राष्ट्रीय वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर देत आहे, एआय आणि मानवी वैद्यकीय कर्मचारी प्रभावीपणे कसे काम करू शकतात, यावर संशोधन सुरू आहे. हे रुग्णालय लवकरच प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज होणार असून, भविष्यात एआय हा आरोग्य पायाभूत सुविधांचा एक अविभाज्य भाग बनू शकतो.

किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

१०,००० रुग्णांवर उपचार

या एआय रुग्णालयाने अवघ्या काही दिवसांत १०,००० पेक्षा जास्त आभासी रुग्णांवर उपचार केले. संशोधकांच्या मते, दर आठवड्याला सरासरी १०० रुग्णांवर उपचार होतात असे मानल्यास, मानवी डॉक्टरांना हे काम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे लागतील. श्वसनाच्या गंभीर आजारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘मेडक्यूए’ डेटासेटवर या एआय डॉक्टरानी ९३.०६% अचूकता नोंदवली आहे, ज्यावरून त्यांच्या निदानाची अचूकता स्पष्ट होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The worlds first ai hospital in china all facilities from recruitment to treatment and follow up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • AI technology
  • Health Care Tips
  • Hospital

संबंधित बातम्या

AI वरुन Elon Musk चा मोठा इशारा; मानवजाती धोक्यात? जगभरात खळबळ
1

AI वरुन Elon Musk चा मोठा इशारा; मानवजाती धोक्यात? जगभरात खळबळ

ॲपलचा नवीन Siri Mode नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा
2

ॲपलचा नवीन Siri Mode नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त
3

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

IIT बॉम्बेमध्ये शिकण्यासाठी चक्क इतका खर्च? सोशल मीडियावर ‘या’ व्हायरल पोस्टमुळे खळबळ!
4

IIT बॉम्बेमध्ये शिकण्यासाठी चक्क इतका खर्च? सोशल मीडियावर ‘या’ व्हायरल पोस्टमुळे खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.