Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिया गेटला जगातील १ ल्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणून मान्यता

मॉरडोर इंटेलिजन्सच्या (Mordor Intelligence) संख्यात्मक अभ्यासात व्हाइट व ब्राऊन बासमती तांदूळ (White and Brown Basmati Rice) या विभागाचा अमेरिका, युरोप, आशिया-पॅसिफिक आणि मध्यपूर्व व आफ्रिका या खंडांमध्ये अभ्यास करण्यात आला.

  • By Vivek Bhor
Updated On: Oct 14, 2022 | 04:33 PM
इंडिया गेटला जगातील १ ल्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणून मान्यता
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सुवासिक बासमती तांदूळ (Fragrant Basmati Rice) ही भारतातील प्रत्येक घरातील आवश्यक बाब आहे. बासमती तांदळाच्या (Basmati Rice) जागतिक बाजारपेठेबद्दल अलीकडेच झालेल्या एका संशोधनात्मक अभ्यासानुसार, या प्रतिष्ठेच्या तांदळाला त्याचा उच्चदर्जा, अव्वल रूप व वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे प्रचंड मागणी आहे.

इंडिया गेट (India Gate) हा केआरबीएलचा (KRBL) फ्लॅगशिप ब्रॅण्ड (Flagship Brand) असून एका आघाडीच्या जागतिक संशोधन कंपनीने नुकत्याच केलेल्या बाजारपेठांच्या अभ्यासात इंडिया गेटला जगातील १ ल्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणून मान्यता देण्यात आली आहे (India Gate is recognized as the number 1 Basmati rice brand in the world).

मॉरडोर इंटेलिजन्सच्या (Mordor Intelligence) संख्यात्मक अभ्यासात व्हाइट व ब्राऊन बासमती तांदूळ (White and Brown Basmati Rice) या विभागाचा अमेरिका, युरोप, आशिया-पॅसिफिक आणि मध्यपूर्व व आफ्रिका या खंडांमध्ये अभ्यास करण्यात आला. प्राथमिक व दुय्यम संशोधन, डेटा ट्रँग्युलेशन व इनसाइट जनरेशन आदी पद्धती वापरून हे संशोधन करण्यात आले.

मॉरडोर इंटेलिजन्स या आघाडीच्या जागतिक संशोधन कंपनीची स्थापना २०१४ साली झाली आणि तेव्हापासून या कंपनीने १०० हून अधिक देशातील विविध उद्योगक्षेत्रांतील ४००० हून अधिक एंटरप्रायजेसना आवश्यक माहिती पुरवण्यासाठी अभ्यासाचे उपक्रम केले आहेत.

इंडिया गेट बासमती राइस हा ब्रॅण्ड १९९८ साली स्थापन झाल्यापासून, निसर्गातील पोषणात्मक आश्चर्य समजल्या जाणाऱ्या बासमती तांदळाच्या माध्यमातून लोकांची आयुष्ये समृद्ध करणारी उत्पादने देण्यासाठी, सातत्याने काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांत, इंडिया गेटने जागतिक ग्राहक फ्रँचायझी विकसित केली आहे. याचा पुरावा म्हणजे या ब्रॅण्डचा तांदूळ ९० हून अधिक देशात निर्यात केला जातो आणि दरवर्षी ८ कोटींहून अधिक पॅकेट्सची विक्री होते. इंडिया गेट बासमती तांदळाचे दाणे आवश्यक तेवढे जुने असतात, त्यामुळे ते अधिक लांब, हलके, मोकळे (चिकट नसलेले) असतात आणि त्यांना सुंदर वास असतो. त्यामुळे अन्य तांदळांहून ते वेगळे लक्षात येतात.

[read_also content=”यांचं ठरलंय! रशियाने अणुबॉम्ब टाकला तर युक्रेनवासियांनी घेतलाय ‘हा’ निर्णय, १५ हजारांहून अधिक जणांनी केली नोंदणी https://www.navarashtra.com/world/russia-ukraine-war-in-ukraine-sex-party-organized-more-than-15-thousand-people-registered-nrvb-336128.html”]

केआरबीएल लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार मित्तल याबद्दल म्हणाले, “शतकभराहून अधिक काळापासूनचा उद्योगक्षेत्राचा समृद्ध अनुभव गाठीशी असल्यामुळे केआरबीएल लिमिटेडने बासमती तांदळाच्या उद्योगात जगात आघाडीचे स्थान पटकावले आहे. ग्राहकांना सर्वोत्तम दर्जा देऊ करण्याचे विनाशर्त वचन आम्ही अगदी सुरुवातीपासूनच पाळत आलो आहोत. आज आमचा फ्लॅगशिप ब्रॅण्ड इंडिया गेट बासमतीचे अव्वल दर्जासाठी जगभर कौतुक होत आहे. अलीकडेच झालेल्या एका अभ्यासामध्ये इंडिया गेट बासमती राइसला जगातील १ ल्या क्रमांकाचा बासमती तांदूळ ब्रॅण्ड म्हणून मान्यता मिळाली आहे आणि जगभरातील ग्राहकांच्या ताटांमध्ये सर्वोत्तम दर्जाचा बासमती पोहोचवण्याच्या आमच्या अढळ वचनाला मिळालेली ही पावती आहे.”

भारतात प्रामुख्याने अनब्रॅण्डेड असलेल्या सुट्या तांदळाच्या बाजारपेठेचे रूपांतर ब्रॅण्डेडमध्ये करणे हे मोठे काम आहे. त्याबद्दल मित्तल सांगतात, “अनब्रॅण्डेड तांदळाला ब्रॅण्डेड करण्यासाठी आवश्यक रूपांतरणाला चालना देण्याचे काम इंडिया गेटने स्वत:कडे घेतले आहे. ग्राहक तसेच विभागाबद्दलच्या ठोस माहितीच्या आधारावर विचारपूर्वक धोरण आखण्यात आले आहे आणि ते अमलात आणले जात आहे. यामध्ये ग्राहकांशी दक्ष संवाद, सध्याच्या ३ लाख दुकानांवरून ५ लाख दुकानांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रिटेल कार्यक्षेत्राचा आक्रमक विस्तार, कमी लोकसंख्या वर्गाच्या बाजारपेठांमध्ये वितरणाचा विस्तार आणि या दिशेने चाललेल्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन यांचा यात समावेश आहे.”

इंडिया गेट बासमती राइस श्रेणीतील उत्पादने सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर तसेच ऑफलाइन आधुनिक व्यापारी दुकाने तसेच सामान्य व्यापारी दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

Web Title: India gate recognized as worlds number 1 basmati rice brand nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 04:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.