Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, बाजारात मोठी घसरण होणार का?

Share Market Update:जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीतील घसरण आणि मागील सत्रातील नफावसुलीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 08:56 AM
Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, बाजारात मोठी घसरण होणार का?

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, बाजारात मोठी घसरण होणार का?

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी 87 पॉइंट्सनी कमजोर ट्रेड होत असल्याने आज सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडू शकतात.
  • तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी भारत डायनॅमिक्स, सीजी पॉवर, आरबीएल बँक आणि पेटीएमसह अनेक स्टॉक्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • मागील सत्रात नफावसुलीमुळे सेन्सेक्स 114 अंकांनी घसरला तर निफ्टी 24,300 च्या वर टिकून राहिला.
India Share Market Update: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचा विचार करता आज ८ मे रोजी, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, शुक्रवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ८७ पॉइंट्सच्या सवलतीवर, २४,२९५ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरांनी पुन्हा घेतली झेप, चांदीही झाली महाग! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन भाव

गुरुवारी, नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, मात्र निफ्टी ५० २४,३०० च्या पातळीच्या वर टिकून होता. सेन्सेक्स ११४.०० अंकांनी, म्हणजेच ०.१५% ने घसरून ७७,८४४.५२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४.३० अंकांनी, म्हणजेच ०.०२% ने घसरून २४,३२६.६५ वर स्थिरावला. आज देखील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळणार का, अशी चिंता गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदांराना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये भारत डायनॅमिक्स , सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स आणि आरबीएल बँकेच्या शेअर्सचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही स्टॉक्सची निवड केली आहे. ज्यामध्ये सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनी लिमिटेड, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), भारत फोर्ज लिमिटेड आणि रॅडिको खैतान लिमिटेड समाविष्ट आहे.

“मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार बीएसई, सीजी पॉवर, एमक्योर फार्मा, केफिन टेक, आयआरएफसी, जीई वर्नोव्हा, डीएफसीएक्स सिस्टीम्स आणि नेल्को या शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्रीसाठी आयईएक्स, केईसी इंटरनॅशनल आणि सुला वाईनयार्ड्स या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian share market may open lower today amid weak global cues experts suggest key stocks to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस
1

Share Market Today: हिरव्या रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात! ‘हे’ स्टॉक्स चमकवतील तुमचं नशिब; तज्ज्ञांनी केली खरेदीची शिफारस

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
2

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल
3

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

NSE IPO : तब्बल 10 वर्षांची प्रतिक्षा संपणार! NSE च्या IPO ला हिरवा कंदील, कोण कोण होणार मालामाल?
4

NSE IPO : तब्बल 10 वर्षांची प्रतिक्षा संपणार! NSE च्या IPO ला हिरवा कंदील, कोण कोण होणार मालामाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.