Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Update: जागतिक बाजारात घसरणीचा हाहाकार, सेन्सेक्सची मात्र 1000 अंकांची भरारी

Share Market Update: अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवर दिसून आला. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी यांसह प्रमुख निर्देशांक घसरले. AI क्षेत्रातील वाढता खर्च आणि टेक कंपन्यांच्या कमाईबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा मार्ग स्वीकारला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 11:25 AM
Share Market Update: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Share Market Update: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आशियाई शेअर बाजारात घसरणीचे सत्र
  • सेन्सेक्सची 1,002 अंकांची दमदार झेप
  • रिलायन्सच्या शेअरमध्ये 5.43% वाढ

 

Asian Stock Market Crash News: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाली. सोमवार, 2 नोव्हेंबरला आशियात सगळीकडे विक्रीचा माहोल होता. सगळे मार्केट लाल रंगात होते. याचं कारण एकच, अमेरिकेत टेक कंपन्यांचे शेअर्स जोरात पडले.

शुक्रवारी अमेरिकेचा नॅसडॅक 100 तब्बल 3.5% कोसळला होता. AI शी संबंधित शेअर्स लोकांनी अक्षरशः फेकून दिले. त्याचाच परिणाम आज आशियावर दिसला. Share Market Update:

आशियात सगळीकडे घसरण

जागतिक गुंतवणूकदार आता घाबरले आहेत. AI चे शेअर्स खूपच जास्त वाढले होते, हा फुगा फुटणार अशी भीती सगळ्यांना वाटतेय. त्यामुळे पॅनिक सेलिंग सुरू झाली आहे. आज सकाळी जपानचा निक्केई 0.39% पडला, टॉपिक्स 0.51% खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी तर 1.06% गडगडला. MSCI आशिया पॅसिफिक निर्देशांक पण 0.5% पडला. फक्त हाँगकाँगचा हँगसेंग फ्युचर्स 0.2% थोडा वाढला, बाकी सगळीकडे विक्रीच विक्री.

Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष

AI वर पैसा ओततायेत पण धंदा मंदावतोय, गुंतवणूकदार नाराज

गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा चालू आहे. मोठ्या टेक कंपन्या AI वर हजारो कोटी रुपये खर्च करत आहेत, पण त्यांचा जो मूळ व्यवसाय आहे तोच मंदावतोय. मग फायदा कसा होणार? हाच प्रश्न गुंतवणूकदारांना पडलाय.गेल्या आठवड्यात अल्फाबेट आणि अॅमेझॉनचे निकाल आले, ते बघून लोक आणखीनच घाबरले. लोकांना वाटतंय की AI मुळेच या कंपन्यांचा कमाईचा धंदा कमकुवत होईल की काय. त्यामुळे सगळे जण आता ‘बघू आणि वाट बघू’ या भूमिकेत आहेत. कोणीही नवीन पैसा टेकमध्ये लावायला तयार नाही.

पण आपला भारत मात्र एकदम जोरात

आशियात सगळीकडे पडझड चालू असताना आपला भारतीय बाजार मात्र वेगळ्याच मूडमध्ये होता. सकाळी उघडताच मार्केटने जोरदार उसळी मारली.गिफ्ट निफ्टी आधीच 200 अंक वाढीचे संकेत देत होता. आणि उघडताच सेन्सेक्स 1002 अंकांनी, म्हणजे 1.35% ने वाढून 75,462 वर गेला. निफ्टी पण 266 अंकांनी वाढून 23,319 वर पोहोचला.

Dhanteras Gold Investment Offer : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर!1 लाखांच्या गुंतवणुकीवर 25% जास्त सोनं; जाणून घ्या भन्नाट ऑफर

या तेजीमध्ये रिलायन्सने बाजी मारली. गेल्या आठवड्यात तिमाही निकालानंतर रिलायन्सचा शेअर 5.43% वाढून 1228 रुपयांवर गेला. म्हणजे अमेरिकेचा परिणाम आशियावर झाला पण भारताने त्याला टक्कर दिली. आता गुंतवणूकदारांचं लक्ष उद्या अमेरिकेत काय होतंय याकडे लागलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2 नोव्हेंबरला सेन्सेक्स किती अंकांनी वाढला?

    Ans: सेन्सेक्स 1,002 अंकांनी वाढून 75,462 वर पोहोचला.

  • Que: निफ्टीमध्ये किती वाढ झाली?

    Ans: निफ्टी 266 अंकांनी वाढून 23,319 वर पोहोचला.

  • Que: रिलायन्सच्या शेअरमध्ये किती वाढ झाली?

    Ans: रिलायन्सचा शेअर 5.43% वाढून 1,228 रुपयांवर पोहोचला.

Web Title: Share market update sensex surges 1002 points asian markets fall rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Big Update
  • share market news
  • Stock market

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
2

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

Share Market: दिवाळीच्या आधीच ‘JIO’ शेअर्सधारकांसाठी फुटले फटाके, 4% वाढला Stock, मोठा फायदा
3

Share Market: दिवाळीच्या आधीच ‘JIO’ शेअर्सधारकांसाठी फुटले फटाके, 4% वाढला Stock, मोठा फायदा

Pune Share Market Scam: पुण्यात हजारो कोटींचा ट्रेडिंग स्कॅम? १० हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
4

Pune Share Market Scam: पुण्यात हजारो कोटींचा ट्रेडिंग स्कॅम? १० हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.