
Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष
गुंतवणूकदार आज आयटीसी, मॅरिको, नॅल्को, एनएलसी इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), जिओ प्लॅटफॉर्म्स, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, एनटीपीसी, सीडीएसएल, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), एसजेव्हीएन, नझारा टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी निवडलेल्या स्टॉक्समध्ये एसबीआय, ब्रिटानिया आणि बायोकोन यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी SJVN, एनएचपीसी, आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी चार स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये स्टॉक्स एथर एनर्जी, डिव्हिज लॅबोरेटरीज, बीएसई आणि इटरनल या शेअर्सचा समावेश आहे.