
Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
Todays Gold-Silver Price: लग्नसराईपूर्वीच घसरले सोन्या-चांदीचे भाव! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,००० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स १६९०.२३ अंकांनी, म्हणजेच २.२५ टक्क्यांनी घसरून ७३,५८३.२२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४८६.८५ अंकांनी, म्हणजेच २.०९ टक्क्यांनी घसरून २२,८१९.६० वर स्थिरावला. अलीकडील पुलबॅकच्या प्रयत्नानंतर, बँक निफ्टी निर्देशांक शुक्रवारी १,४३३.५० अंकांनी किंवा २.६७% ने घसरून ५२,२७४.६० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्रीसाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये ओएनजीसी, अॅस्टर डीएम हेल्थकेअर, नाल्को यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी गुंतवणूकादारांना पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना शिफारस केलेल्या शेअर्समध्ये नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, एनएलसी इंडिया, होनासा कंझ्युमर, एथर एनर्जी आणि ऑरोबिंदो फार्मा यांचा समावेश आहे.