Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक फेक मेसेज आणि AI जनरेटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात २१,००0 रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ३.५ लाख रुपये मिळतील असा दावा केला जात आहे. PIB Fact Checkने हा दावा पूर्णपणे खोटा आणि सायबर फसवणुकीचा भाग असल्याचे स्पष्ट केले आह

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 21, 2026 | 06:40 PM
(फोटो सौजन्य:Chatgpt)

(फोटो सौजन्य:Chatgpt)

Follow Us
Follow Us:

पंतप्रधाम मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. गुंतवणूक योजनेबाबत ही घोषणा असलेला व्हिडीओ तुमच्याही फीडवर आला असेल तर आताच सावध व्हा. सोशल मीडियाच्या या युगात माहिती झपाट्याने पसरते आणि दिशाभूल करणारी खोटी माहितीही लोकांपर्यंत वेगाने पोहोचते. याच संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा प्रचार करताना दिसत आहेत. नेमकं काय आहे या व्हिडीओ मागे समजून घेऊयात.

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा

PIB फॅक्ट चेकने धक्कादायक खुलासा

एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘क्वांटम एआय’ नावाचे एक गुंतवणूक प्लॅटफॉर्म केवळ २१,०००-२२,००० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून दरमहा ३.५ लाख रुपयांपर्यंतची भरीव कमाई करून देऊ शकते. भारत सरकारची अधिकृत तथ्य-तपासणी शाखा असलेल्या पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल व्हिडिओची तपासणी केली असता, तो AI द्वारे तयार केलेला डीपफेक असल्याचे आढळले. PIB च्या तथ्य-तपासणी युनिटने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, याला एक ऑनलाइन गुंतवणूक घोटाळा म्हटले आहे.

🚨 Don’t Fall for ‘Easy Money’ Investment Scams‼️ A manipulated video circulating online falsely shows Prime Minister @narendramodi endorsing an investment platform and claiming returns of up to ₹3.5 lakh per month on an investment of ₹22,000.#PIBFactCheck ❌ This video is… pic.twitter.com/NWQgGH9Z2X — PIB Fact Check (@PIBFactCheck) June 19, 2026

PIB ने काय म्हटले?

‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, PIB फॅक्ट चेकने म्हटले आहे की, हा व्हिडिओ बनावट असून तो AI वापरून तयार करण्यात आला आहे. भारत सरकारने अशा कोणत्याही गुंतवणूक प्लॅटफॉर्म किंवा योजनेला मान्यता दिलेली नाही. संशयास्पद लिंक्सवर कधीही क्लिक करू नका किंवा तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी अधिकृत स्रोतांकडून माहितीची पडताळणी करा.

खोट्या बातम्यांची तक्रार कुठे करावी?

जर तुम्हाला सोशल मीडियावर दिशाभूल करणारी सरकारी माहिती आढळल्यास, तुम्ही थेट PIB फॅक्ट चेकला त्यांच्या व्हॉट्सॲप नंबर – +91 8799711259 वर किंवा factcheck@pib.gov.in वर ईमेल करून तक्रार करू शकता.

आजकाल डीपफेक तंत्रज्ञानाच्या गैरवापराची प्रकरणे वाढत आहेत. घोटाळेबाज व्यक्तींचे व्हिडिओ अशा प्रकारे तयार करण्यासाठी AI चा वापर करतात की त्यांचे स्वरूप, उंची, आवाज आणि बोलणे पूर्णपणे खरे वाटावे. अशा प्रकारे, घोटाळेबाज निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करतात.

El Nino चा वाढतोय धोका… IMD कडून अलर्ट! भारतीय अर्थव्यवस्था मंदावणार? शेतीपासून महागाईपर्यंत सर्वत्र परिणाम

Web Title: Pm modi fake investment scheme 3 5 lakh message pib alert see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • ai
  • Business News
  • fake video
  • investment
  • Marathi News
  • narendra modi
  • share market

संबंधित बातम्या

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल
1

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश
2

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा
3

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा

गिरीश महाजन यांचा व्हायरल फोटोंवरून मोठा खुलासा, ‘ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी…’
4

गिरीश महाजन यांचा व्हायरल फोटोंवरून मोठा खुलासा, ‘ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.