
गणेशोत्सवात Instamart चे ट्रेंड्स ( सौजन्य - सोशल मीडिया )
पर्यावरणपूरक गणपती अधिकाधिक घरांमध्ये विराजमान झाले आहेत. तयार मातीच्या मूर्तींचा एकूण मागणीत ९०% वाटा होता, त्यानंतर ‘पेंट-युअर-ओन’ इको मूर्तींचा क्रमांक लागला. गणेशोत्सवाच्या पारंपारिक केंद्रांपलीकडील शहरांमधून सर्वाधिक मोठी वाढ दिसून आली. दिल्लीमध्ये इको-गणपतींच्या ऑर्डर्समध्ये १,७१८% वाढ झाली, त्यापाठोपाठ कोलकाता १,३०५%, नोएडा १,१३६% आणि भुवनेश्वरमध्ये १,१३२% वाढ नोंदवली गेली.
उत्सवाच्या मिठाईमध्ये मावा मोदक आघाडीवर राहिले, त्यानंतर क्लासिक, केशर, काजू, असॉर्टेड आणि आंबा मोदकांना पसंती मिळाली. प्रत्येक शहराची फ्लेवरची आवड वेगळी दिसून आली. बंगळुरू, मुंबई आणि हैदराबादमध्ये मावा मोदक आघाडीवर होते. दिल्ली आणि गुडगावचा कल केशराकडे राहिला, तर पुणे, चेन्नई, कोलकाता आणि नागपूरने क्लासिक मोदकाला पसंती दिली. मध्य गोव्याने वेगळी वाट चोखाळत काजू मोदकाला पहिली पसंती दिली.
पुजेच्या थाळीला मागणी जोरदार होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी (१४ सप्टेंबर २०२६) सकाळी ७:४२ वाजता फुलांच्या ऑर्डर्सनी प्रति मिनिट ८६८ ऑर्डर्सचा उच्चांक गाठला. सकाळी ८:४८ वाजता जेव्हा कुटुंबांनी बाप्पाचे घरी स्वागत केले, तेव्हा पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींची मागणी शिगेला पोहोचली. कापूर, वाती आणि अगरबत्ती यासह पूजेच्या साहित्याची मागणी सकाळी ९:४५ वाजता सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आणि सकाळी १०:३९ वाजता नैवेद्याची वेळ झाली: मोदकांच्या ऑर्डर्सनी उच्चांक गाठला, ज्यामध्ये मावा मोदक अव्वल होते आणि त्यापाठोपाठ केशर व क्लासिक मोदक राहिले.